श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक खर्डा चौकात करावे – पांडुरंग भोसले
जामखेड नगरपरिषद प्रारुप विकास आराखडा योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी पंचायत समिती सभागृह येथे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या प्रारूप विकास आराखडा बैठकीत खर्डा चौक जामखेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका बाबत जामखेड तालुक्यातील शहरातील समस्त शिवप्रेमी नागरिकांनी खर्डा चौक येथे शिवस्मारक बाबत मागणी केली होती.
तरी जामखेड नगरपरिषद यांच्या मार्फत सहायक संचालक नगर रचना अहिल्यानगर यांच्या कडे संबंधित स्मारकारासाठी जागा खर्डा चौक येथे आरक्षित केले आहे काय जर नसेल केले तर आपणास विनंती आहे कि संबंधित खात्याला योग्य पत्रव्यवहार करून जामखेड तालुक्यातील शहरातील शिवप्रेमीं नागरिकांची मागणी पुर्ण करावी तसेच आज पर्यंत संबंधित विषयासाठी आपण संबंधित खात्या बरोबर काय पत्रव्यवहार केला आहे त्याची माहिती द्यावी,
हि विनंती असे निवेदन नगराध्यक्षा सौ.प्रांजलताई अमित चिंतामणी यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा यांनी बोलताना सांगितले की अनेक वर्षांपासून खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी समस्त शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्वपक्षीय यांच्या वतीने पाठपुरावा तसेच निवेदन ही देण्यात आले होते. लवकरच सर्व शिवभक्तांच्या असलेली मागणी मी प्रशासनाला कळवुन लवकरच पुर्ण करण्याचे सर्व शिवप्रेमींना आश्वासन देते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासाठी मी नगराध्यक्षा म्हणून प्रयत्नशील राहील यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी बोलताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे खर्डा चौक येथे करुन सर्व शिवप्रेमीच्यां भावनेचा निष्ठेचा विचार करुन लवकरात लवकर पुर्ण करावे.
तसेच विधानपरिषद सभापती मा राम शिंदे साहेब व आमदार रोहीत दादा पवार यांनाही या अगोदर निवेदन देण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, पांडुराजे भोसले नगरसेवक प्रवीण सानप, नगरसेवक श्रीराम डोके,उमेश राळेभात,सुरज काळे,पिंटु डुचे,सचिन देशमुख,गणेश मासाळ, तोरडमल सर,ज्ञानेश्वर भोसले,सुदर्शन फड,जगदीश कानडे,राऊत सर,डाॅ.बांगर,योगिता देशमुख, कल्याणी मासाळ, इनामदार ताई, मनिषा बांगर, इंदुताई परदेशी यासह सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.