सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा भाजपा कर्यकर्त्यांचे पालकमंत्रयांना साकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टातील बॉल सभापती प्रा .राम शिंदे यांच्या कोर्टात

0
422

जामखेड न्युज——-

सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता तातडीने पूर्ण करा भाजपा कर्यकर्त्यांचे पालकमंत्रयांना साकडे

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टातील बॉल सभापती प्रा .राम शिंदे यांच्या कोर्टात

 

अठरा महिन्याची मुदत असताना तीन वर्षे झाले तरी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम खर्डा चौक ते समर्थ हाँस्पीटल अपुर्ण रस्ता आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी वीस दिवसांपूर्वी आढावा बैठक घेत ताबडतोब काम सुरू करावे. अडथळा आणणाऱ्या विरूद्ध फौजदारी कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या तरीही काम सुरू झाले नाही. पाच दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी रस्ता सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. तरीही रस्ता सुरू झाला नाही. तेव्हा नगराध्यक्ष, नगरसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजर, महामार्ग अधिकारी, पत्रकार संयुक्त बैठक घेण्यात आली. यात प्रलंबित कामाबाबत नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराला घेतले फैलावर घेतले. तहसीलदार यांनीही कडक शब्दात ठेकेदार व प्रोजेक्ट मॅनेजरला इशारा दिला. तसेच दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा करणार करू असे अमित चिंतामणी यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जामखेड शहरातील खर्डा चौक ते बीड रोडवरील समर्थ हॉस्पीटल पर्यंतचा अपुर्ण रस्ता यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या तसेच अपुर्ण रस्ता कामातील बाहेर निघलेले गज हे धोकादायक बनले आहेत. समर्थ हॉस्पीटल समोर एक साईट शंभर फुट सिमेंट रस्ता बनवला आहे याला पंचवीस दिवस झाले पुढील काम ठप्प आहे तसेच रस्ता कामाच्या बाहेर निघलेले गज खुपच धोकादायक बनले आहेत.

गजामुळे अनेकजण बळी गेले अनेक जणं जखमी झाले आहेत. ताबडतोब रस्ता काम पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.

अठरा महिन्याची मुदत असताना तीन वर्षे झाली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ,ठेकेदारा यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले. आनेक अंदोलने झाली शेवटी नगरपरिषदने घेतलेल्या बैठकीचा ठेकदार व अधिकारी यांना जाग आली व त्यांनी रात्री रोडच्या कामाला सुरवात केली .

चौकट
पालकमंत्र्याच्या कोर्टातील बॉल सभापतीच्या कोर्टात

आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जामखेड दौऱ्यावर आले असता जामखेड मधील भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांबद्दल तक्रार केली असता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राष्ट्रीय महामार्गीचे काम नियमानेचं होईल पुणे येथील अनेक रेस्टॉरंट पाडण्यात आली परंतु जामखेडमध्ये राजकारण चालु असल्यामुळे या गोष्टी घडतात सभापती प्रा . राम शिंदे यांचे नांव न घेता तुम्हाला सभापती पद देले आहे . आपल्या कोर्टातील बॉल सभापती प्रा . राम शिंदे यांच्या कोर्टात ढकळला . आता राष्ट्रीय माहा मार्गाच्या रस्त्यासाठी प्रा . राम शिंदे काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here