आपल्या कृषी प्रधान देशात कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन व्हावे – विजय मुळीक
बाल वैज्ञानिक प्रदर्शनात जिल्ह्यातून २४२ मॉडेल सहभागी झाले.
आपला भारत देश कृषी प्रधान आहे यामुळे कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन होणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. विज्ञान प्रदर्शन चांगले आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवत रहावे असे आवाहन मुळिक यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी नागेश विद्यालय व कन्या विद्यालय मध्ये उत्साहात संपन्न झाले. बाल वैज्ञानिक प्रदर्शनात जिल्ह्यातून २४२ मॉडेल सहभागी झाले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्रह्मोस मिसाइल प्रतिकृतीने अहिल्यानगर जिल्ह्याचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर प्रमुख उपस्थिती माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात ,गटविकास अधिकारी शुभम जाधव शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे व भिवशेन पवार , पार्वती गाडेकर, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी अशोक आंधळे,केंद्र प्रमुख राम निकम , स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, प्रा मधुकर आबा राळेभात ,प्रकाश सदाफुले, विनायक राऊत, बद्रीनाथ शिंदे, दशरथ कोपनर, संजयकुमार निकरट, नवनाथ घुले, धनंजय भागरे,भाऊसाहेब इतापे ,बाजीराव गर्जे,मुकुंद सातपुते, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका भोर आर आर, उप मुख्याध्यापक नाळे एस एन, पर्यवेक्षक जाधवर व संजय हजारे, संतोष ससाने, साळुंके बी एस. एनसीसी प्रमुख मयुर भोसले,नागेश विद्यालय कन्या विद्यालय येथील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व जिल्ह्यातील सर्व स्पर्धक उपस्थित होते.
यावेळी सर्व जिल्ह्यातून २४२ मॉडेल सहभागी झाले. परीक्षक – व्ही एम वाळुंजकर, दीपक धनगर प्रफुल्लचंद्र पवार ,सोपानराव कदम ,अनिल गवळी ,बाळासाहेब सोनवणे, संदीप जगताप विक्रम कुलकर्णी ,रवींद्र हिंगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रास्ताविक प्राचार्य मडके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.विज्ञान संघटना जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे प्रदर्शनाचा उद्देश भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणे. पुढच्या वर्षी शेष फंडातून जास्त निधीची मदत करावी. विद्यार्थ्यांना भावी वैज्ञानिक करण्यासाठी त्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळेल.
पुढील वर्षी चार दिवसाचा विज्ञान प्रदर्शन करावे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.गटविकास अधिकारी शुभम जाधव विज्ञान म्हणजे काय व त्याचा वापर कसा करावा सोप्या भाषेत समजून सांगितले विज्ञान म्हणजे कुतुहल वप्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणे म्हणजे विज्ञान व त्या पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून तंत्रज्ञानाची निर्मिती होते. मुलांमधील चिकित्सिक वृत्तीतून नवनवीन प्रयोग निर्माण होतात. मुलांमध्ये कुतुहल निर्माण करण्याचे काम बाल वैज्ञानिक प्रदर्शन करत आहे.विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी असे मार्गदर्शन केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम जिल्ह्यातील आलेले बाल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयीची प्रतिज्ञा दिली विद्यार्थ्यांनी पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.विद्यार्थ्यांनी नवीन वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा व नवीन शोध लागण्यासाठी नव नवीन प्रश्न निर्माण करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.असे मनोगत व्यक्त केले.
उद्याच्या भारतामध्ये बाहेरून आलेले तंत्रज्ञान पेक्षा स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी लहान मुलांच्या मधून विविध शास्त्रज्ञ बनणार आहेत त्यामुळे आम्ही निधी निश्चित वाढवून देऊ . विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होत आहे. ब्रह्मोस मिसाईलने उद्घाटन केले ही भारताची ताकद आहे केले.आपला देश कृषी प्रधान देश आहे कृषी विभागातील जास्तीत जास्त संशोधन व्हावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
विद्यार्थ्यांची नाळ शेतीसाठी जुळलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी शेती विषयातील तंत्रज्ञान विकसित करावे. असे मनोगत व्यक्त केले. शिस्तीचे नियोजन एनसीसी विभाग मार्फत उत्कृष्ट करण्यात आले.
विशेष आकर्षण:- ब्रह्मोस मिसाइलची हुबेहूब प्रतिकृती ने सर्व जिल्ह्यातून आलेल्या बालवैज्ञानिकांचे व मान्यवरांचे मन आकर्षित केले .
सूत्रसंचालन संभाजी इंगळे, शंभूलाल बडे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका भोर आर आर मॅडम यांनी केले.