प्रलंबित कामाबाबत नगरपरिषदेने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराला घेतले फैलावर दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा करणार – अमित चिंतामणी
प्रलंबित कामाबाबत नगरपरिषदेने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराला घेतले फैलावर
दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा करणार – अमित चिंतामणी
अठरा महिन्याची मुदत असताना तीन वर्षे झाले तरी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम खर्डा चौक ते समर्थ हाँस्पीटल अपुर्ण रस्ता आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी वीस दिवसांपूर्वी आढावा बैठक घेत ताबडतोब काम सुरू करावे. अडथळा आणणाऱ्या विरूद्ध फौजदारी कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या तरीही काम सुरू झाले नाही. पाच दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी रस्ता सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. तरीही रस्ता सुरू झाला नाही. तेव्हा आज नगराध्यक्ष, नगरसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजर, महामार्ग अधिकारी, पत्रकार संयुक्त बैठक घेण्यात आली. यात प्रलंबित कामाबाबत नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराला घेतले फैलावर घेतले. तहसीलदार यांनीही कडक शब्दात ठेकेदाराला इशारा दिला.तसेच दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा करणार करू असे अमित चिंतामणी यांनी सांगितले.
प्रलंबित प्रश्न राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे म्हणून आजच्या बैठकीत तहसीलदार धनंजय बांगर, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगराध्यक्ष प्रांजळ चिंतामणी, अमित चिंतामणी, गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक संजय काशिद, पोपट राळेभात, श्रीराम डोके, प्रविण होळकर, मनोज कुलकर्णी, अँड. प्रविण सानप, विकी घायतडक, संतोष गव्हाळे, सागर टकले, अर्जुन म्हेत्रे, हर्षद काळे, अशोक शेळके, मोहन पवार, राम पवार यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जामखेड शहरातील खर्डा चौक ते बीड रोडवरील समर्थ हॉस्पीटल पर्यंतचा अपुर्ण रस्ता यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या तसेच अपुर्ण रस्ता कामातील बाहेर निघलेले गज हे धोकादायक बनले आहेत. समर्थ हॉस्पीटल समोर एक साईट शंभर फुट सिमेंट रस्ता बनवला आहे याला पंचवीस दिवस झाले पुढील काम ठप्प आहे तसेच रस्ता कामाच्या बाहेर निघलेले गज खुपच धोकादायक बनले आहेत.गजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. ताबडतोब रस्ता काम पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले आज तहसीलदार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास बैठक झाली जर दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला तसेच दहा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी वेळ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन दिले जाईल.
चौकट अठरा महिन्याची मुदत असताना तीन वर्षे झाली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. ठेकेदाराला रस्ता अपुर्ण कोठे राहिला. तसेच बीड रोड कोठे आहे. खर्डा चौक कोठे आहे हेच माहिती नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. तसेच प्रोजेक्ट मॅनेजर नरेंद्र गांगुले हे सतत खोटे बोलतात. आश्वासने देतात पण पुर्ण करत नाहीत. आता दहा दिवसांत काम सुरू करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.