जामखेड शेती अवजारे व मशिनरी युनियन असोसिएशन च्या अध्यक्षपदी सुनील कोठारी तर सचिवपदी ओंकार पवार

0
319

जामखेड न्युज——

जामखेड शेती अवजारे व मशिनरी युनियन असोसिएशन च्या अध्यक्षपदी सुनील कोठारी तर सचिवपदी ओंकार पवार

जामखेड येथे नुकतीच शेती अवजारे व मशिनरी युनियन असोशिएशन ची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी माजी सरपंच व प्रसिद्ध व्यापारी सुनिल कोठारी यांची निवड करण्यात आली. सचिवपदी ओंकार पवार तर उपाध्यक्षपदी जुबेरभाई खान व शिवप्रसाद कोळपकर यांची निवड करण्यात आली.

विषेश म्हणजे या निवडीवेळी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी शेती अवजारे व मशिनरीची दुकाने बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्माण घेण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल कोठारी यांनी सांगितले की युनियन ची स्थापना करण्याचा उद्देश म्हणजे युनियनच्या एकजुटीचा फायदा काय होतो.

हे माहीत होण्यासाठी, तसेच अनेक वेळा व्यापार्‍यांनावर हल्ले होतात याला विरोध करण्यासाठी एकजुट महत्त्वाची असते व सर्वांनी कुटुंबाप्रमाणे रहावे या उद्देशाने या असोशिएशन ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती दिली.

यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व उपाध्यक्ष यांना व्यापार्‍यांच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्यापारी उमाकांत अंदुरे, बापु जरे, आशोक बाफना, बंडु गव्हाणे, दत्तात्रय हजारे, माऊली गोरे, नितिन बाफना, अमोल नगरे, सनी बांदल, रोशन बाफना, सचिन बेद्रे, निलेश डांगे, राकेश गुप्ता, राजु शेख, सोनु टेकाळे, कांतीलाल वाळुंजकर, मारुती लाड, पप्पु पवार भागवत जायभाय, बापु वाळुंजकर व रविंद्र शेळके सह अनेक व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here