जामखेडचे भुषण डॉ. मिसबाह शेख जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन
पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराच्या वतीने डॉ .मिसबाह शेख यांचा सत्कार
जामखेडचे भुषण ठरलेले डॉ. रजनीकांत आरोळे, कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या नंतर डॉ. मिसबाह शेख यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत वआपल्या हुशारीच्या जोरावर त्यांनी जिल्ह्यात ग्लुकोमा सर्जन ही पदवी धारण करणाऱ्या पहिल्या डॉक्टर ठरल्या आहेत. त्यामुळे त्या जामखेड करांसाठी हे भुषण ठरल्या आहेत. आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या वतीने जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण व मिडीया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांनी डॉ. मिसबाह तीचा आई वडील व मामा समवेत सत्कार करण्यात आला.
डॉ. मिसबाह शेख या अगदी पहिलीपासून खुपच हुशार होत्या 2012 मध्ये दहावी बोर्ड परिक्षेत 98.45 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम तसेच पुणे बोर्डात पहिल्या पन्नास मध्ये क्रमांक पटकावला. बारावीला 89 टक्के गुण घेत एन्सस्पायर अवार्ड शिष्यवृत्ती मिळवली.
वडील डॉक्टर असल्याने लहान पणापासून वैद्यकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली. त्यादृष्टीने नीटची तयारी करत शासकीय कोट्यातून एमबीबीएस साठी काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथे नंबर लागला साडेपाच वर्षात पदवी मिळवली यानंतर एम.एस. (नेत्ररोग) पदव्युत्तर शिक्षण लातूर येथून प्रथम श्रेणीत पूर्ण केले. यानंतर देशातील अग्रगण्य असलेल्या कोईम्बतूर (तामिळनाडू) येथून सुपर स्पेशालायझेशन ग्लुकोमा विषयातील दोन वर्षांची फेलोशिपचे शिक्षण पूर्ण केले. हि शिक्षण घेणारी डॉ. मिसबाह शेख हि जिल्ह्यातील पहिलीच आहे. त्यामुळे खरोखरच जामखेड करांसाठी भुषण ठरल्या आहेत.
डॉ. मिसबाह शेख या जिल्ह्यातील पहिलीच ग्लुकोमा सर्जन ठरल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझी सेवा अहिल्यानगर शहरात सुरू करणार आहे पण जन्मभूमी असणाऱ्या जामखेड साठी आठवड्यातील दोन दिवस वेळ देणार आहे (शनिवार रविवार)
चौकट
गुरुवर्यांचे मार्गदर्शन मोलाचे
माझ्या यशामध्ये गुरुवर्य श्रीकांत होशिंग, एन एन पारखे, बी. ए. पारखे, नरेंद्र ढाळे, अनिल देडे, मुकुंद राऊत तसेच आई – वडील आजोबा, मामा यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असे सांगितले . दहा वर्षांत कोणतेही घरगुती कार्यक्रम केले नाही फक्त अभ्यास आणि अभ्यास म्हणजेच १३ ते १४ तास अभ्यासचं करून ध्येय पुर्ण करणारी डॉ .मिसबाह . विशेष म्हणजे मुस्लीम समाजामध्ये हज यात्रेचे खुप मोठे महत्व असते . वडिल डॉ फारूख आझम धार्मिक असल्यामुळे मिस बाह हि आठवीत असताना हज यात्रा करून आली होती .
चौकट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा न्युनगंड बाळगु नये
सध्या इंग्रजी माध्यमाचे फँड सुरू आहे. मी मराठी माध्यमात शिकले मराठी माध्यमाची मुलेही जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशस्वी होऊ शकतात त्यांनी न्युनगंड बाळगू नये. अभ्यास महत्त्वाचा आहे. आई वडिलांची सेवा करा असाही संदेश दिला. तसेच मोबाईल मुळे अभ्यासास खुप मदत होते मोबाईल चा चांगला वापर करा ज्ञान मिळवा असेही सांगितले .
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच ग्लुकोमा सर्जन म्हणून डॉ. मिसबाह फारुख शेख यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरातील प्रसिद्ध डॉ. फारुख आझम यांची कन्या व डॉ. सादेख पठाण यांची भाची असलेल्या डॉ. मिसबाह शेख यांनी कोईम्बतूर (तामिळनाडू) येथून ग्लुकोमा विषयातील दोन वर्षांची फेलोशिप नुकतीच १ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
बारावीनंतर तब्बल ११ वर्षांचा त्यांचा वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सातत्याने यशस्वी ठरत गेला असून त्यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच चढता राहिला आहे. तिच्या या यशाबद्दल तालुक्यातून तिचावर अभिनंदन व सत्काराचा वर्षाव होत आहे .