विधानपरिषदेत लक्षवेधी – पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नोंदणीचा मार्ग मोकळा
मुख्यप्रर्वतक वर्षाराणी पांडूरंग उबाळे
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रवीण जी दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमध्ये जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे खाते मागील संस्था प्रस्ताव दि 17/4/17 रोजी साहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांच्या कडे दाखल केला सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांनी दि 19/3/2024 रोजी मंजूरी दिली व 15/4/2024 रोजी साहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांनी खाते उघडनेयाच पत्र दिले परंतु जिल्हा बॅंक आहिल्यानगर यांनी दि 10/6/2024 रोजी पत्र पाठवलं दि 24/2/2022 चा ठराव क्रमांक 15 आनवे खाते उघडता येनार नाही आसे कळवले या बाबत विभागीय सह निबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कडे तक्रार केली आसता त्यांनी तक्रार दार मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडूरंग उबाळे यांनी आर्जात नमूद संस्था खाते उघडने हि बाब बॅंक स्तरावर असून कार्यवाही तात्काळ करावी व बॅंक मंजूर उप विधी व महाराष्ट्र सहकारी आधी नियम 1960 व नियम 1961 मधील तरतुद व शासन परिपत्रक यांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
असे सांगीतले तरी पण खाते उघडले नाही मग शेवटी मुख्यप्रवर्तक मा.उच्च न्यायालय खंडपीठ अैारंगाबाद येथे रिट पिटीशन 2959/2025 दाखल केली असून सध्या स्थीत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
दोन वर्ष आशा प्रकारे जिल्हा बॅक अहिल्यानगर यांनी संस्था मुख्यप्रर्वतक व सभासद शेतकरी यांची पिळवणूक करून कर्जा पासून व पंजाबराव क्रूषी पंत पुरवठा धोरण शुन्य ट्क्के व्याज दरा या योजने पासून व कर्ज माफी सारख्या योजने पासून वंचित ठेवले व दोन वर्ष विविध कार्यालय न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावल्या दरम्यानच्या काळात कर्जत जामखेड चे भूमिपुत्र राम शिंदे साहेब विधानपरिषद सभापती झाले आणी मुख्यप्रवर्तक पुण्यश्लोक वि.का.सेवा सोसायटी चोंडी यांची लक्षवेधी दाखल करून आमदार प्रविन दरेकर व श्रीकांत भारती यांनी हि लक्ष वेधी मांडली व सभापती राम शिंदे साहेब यांनी आदेश दिले व उत्तरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ खाते उघडण्याचे आदेश दिले एवढे दिवस प्रलंबित असणारा विषय मार्गी लावला व कर्जवाटप करण्याचे आदेश देण्यात आले.
या निर्णयामुळे संस्थेचे दिनांक 2/01/2026 रोजी खाते उघडण्यात आले असून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असून येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर च जामखेड तालुका मध्ये एक मतदानाची भर पडणार असून विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचे पारडे जड झाल्याचे दिसत असून अशा प्रलंबित असणाऱ्या संस्थांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसणार आहे.
सदर संस्थेचे खाते उघडल्यामुळे संस्था नोंदणीचा पुढील मार्ग मोकळा झाला असून परिषद सभापती राम शिंदे यांच्या आदेशामुळे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाला चांगलीच चपराक बसली आहे.
पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चोंडी चे मुख्य प्रवर्तक वर्षाराणी पांडुरंग उबाळे यांचे विविध स्थरातून अभिनंदन होत आहे.
चौकट
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असून त्याच्या अगोदरच जामखेड तालुक्यात एक मताची वाढ झाली आहे. यामुळे सभापती प्रा राम शिंदे गटाचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.