मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला वाहनाची धडक यात महिलेचा जागीच मृत्यू वाहनासह वाहनचालक फरार नववर्षाच्या पहाटेची घटना

0
1646

जामखेड न्युज——

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला वाहनाची धडक यात महिलेचा जागीच मृत्यू

वाहनासह वाहनचालक फरार नववर्षाच्या पहाटेची घटना

 

जामखेड शहरातील तपनेश्वर गल्लीतील दोन महिला गुरुवारी पहाटे पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना चारचाकी पिकअप वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेनंतर पिकअप वाहन चालक वाहनासह फरार झाला. नववर्षाच्या सुरवातीला सदर घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत जामखेड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जामखेड पोलीसात किरण महादेव गांगर्डे (वय ३४, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) यांनी फिर्याद दिली की, माझी आई विमल महादेव गांगर्डे (वय ५४, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही मैत्रीण सोबत गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी जामखेड – जांबवाडी जाणा-या रस्त्यावरून नवीन महादेव मंदिर जवळ सेंच्युरी शाळेसमोरून पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. या घटनेनंतर सदर वाहनचालक वाहनासह फरार झाला.

सदर ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी सदर जखमी महिलेला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले सदर डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात पाठवले. व तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वीच सदर जखमी महीलेला मयत घोषीत केले.

जामखेड पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सदर गाडीचा शोध घेऊन पिकअप वाहन क्रमांक (एम एच १६-डिपी ३५३६)गुरुवारी दुपारी ताब्यात घेऊन वाहनचालक अमोल अशोक डोके (रा. भुतवडा ता. जामखेड) याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here