साकत घाटात अपघाताची मालिका सुरूच उसाचा ट्रक पलटी, चालक जखमी

0
616

जामखेड न्युज——

साकत घाटात अपघाताची मालिका सुरूच उसाचा ट्रक पलटी, चालक जखमी

अरूंद घाट, वाहनांची वर्दळ यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज सकाळी बीड कडून येणारा उसाचा ट्रक घाटात वळणावर पलटी झाला यात चालक जखमी झाला आहे. त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहने साकत मार्गे ये जा करतात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली आहे. पण अरूंद रस्ता अरूंद घाट यामुळे वळणाचा आंदाज येत नाही. यामुळे सतत अघघात होत आहेत अपघाताची मालिका सुरूच आहे यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लवकरात लवकर रस्ता व घाट रुंदिकरण करावे अशी मागणी होत आहे.

हार्वेस्टर ने काढलेला ऊस ट्रक बीड कडून बारामती कडे चाललेला होता आज सोमवार सकाळी वळणाचा आंदाज आला नाही यामुळे वळणावर गाडी पलटी झाली यात चालक गुंतलेला होता तेव्हा साकत वरून जामखेड ला चाललेले हरीभाऊ मुरूमकर, नाना आढाव, बागल साहेब यांनी थांबून चालकाला गाडी बाहेर काढले व जामखेड येथील दवाखान्यात हलवले यात तो जखमी झाला आहे.

ऊसाची गाडी पलटी झाल्याने ऊसाचे तुकडे रस्त्यावर पडलेले होते. लोकांनी ऊस बाजूला करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता करून दिला. साकत घाटात अपघात नेहमीच होत आहेत लवकरात लवकर रस्ता व घाट रुंदिकरण करावे अशी मागणी होत आहे.

सध्या साकत जामखेड रस्ता ही खुपच खराब झालेला आहे. साइट पट्ट्या खचलेल्या आहेत. घाटात बँरीकेटर गरजेचे आहेत. तसेच मोठा रस्ता व घाटाचे रूंदीकरण गरजेचे आहे.

वर्षभरात पंधरा पेक्षा जास्त अपघात या रस्त्यावर झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here