जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
योग्य मार्गदर्शन व नियमितपणे सराव, अभ्यास यामुळे सात वर्षांत २०० मुले सैन्यात भरती तर पोलीस मध्ये पाच मुले व दोन मुली भरती झाल्याने अल्पावधीतच शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीने राज्यात एक आदर्श अकॅडमी म्हणून आपले नावलौकिक कमावले आहे. तसेच जामखेड करांसाठी निरामय आरोग्याची पहाटेची सुरूवात या अकॅडमी मुळे झाली आहे दररोज सकाळी व सायंकाळी हजारो लोक अकॅडमी परिसरात व्यायामासाठी फिरणे व धावण्यासाठी येतात कारण अकॅडमी मुळे सर्वाना सुरक्षित वाटते. अकॅडमी मार्फत देशप्रेम, व्यसनमुक्ती, आत्मविश्वास, व्यक्तीमत्व विकास, समाजाबद्दल जनजागृती, करिअर मार्गदर्शन याचे धडेही गिरवले जातात. चालू वर्षी तेवीस विद्यार्थी सैन्यात भरती झाले आहेत. सध्या १५० मुले – मुली प्रशिक्षण घेत आहेत.
सप्टेंबर महिन्यात महाभरती असल्याने नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले घरा घरात एक सैनिक तयार व्हावा म्हणून नान्नज, जवळा, शिऊर या ठिकाणी जाऊन भरतीसंदर्भात मार्गदर्शन ठेवले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज तरूण वर्ग व्यसनाच्या आहारी भरकटत चालला आहे त्याला यातून बाहेर काढून देशभक्त सैनिक तयार करणे हे आमचे ध्येय आहे असे जामखेड न्युजशी बोलताना कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी सांगितले.
कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी २०१० साली सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये शिवनेरी अकॅडमी ची स्थापना केली सात वर्षांत २०० विद्यार्थी सैन्यात भरती झाले आहेत तर सात पोलीस खात्यात आहेत देशभक्त सैनिक घडविण्याचे काम अकॅडमी करत आहे. भरतीपुर्व प्रशिक्षणामार्फत नियमितता, योग्य सराव, अभ्यास व भरतीसाठी जे आवश्यक आहे तो संपुर्ण सराव नियमितपणे करून घेतला जात आहे. फक्त पैसे कमावणे हा उद्देश नसून ग्रामीण भागातील तरूण पिढीला योग्य दिशा देणे व्यसनमुक्त तरूण घडविणे देशप्रेम, आई वडील व गुरूबद्दल आदर निर्माण शिकवणे पहाटे पाच वाजता नियमितपणे अकॅडमी मधील मुलांचा सराव सुरू होतो. आवश्यक तेवढी रनिंग घेतली जाते कवायत होते. भरतीसाठी कोणकोणत्या अॅक्टीव्हिटी लागतात त्या करण घेतल्या जातात परत वेगवेगळ्या विषयांवरील तास होतात. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना राबविली जाते सिक्युरिटी गार्ड चे काम दिले जाते.
परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शिवनेरी हेल्थ क्लब २०१६ पासून सुरू केला आहे. दररोज साठ ते सत्तर युवक व्यायामाचा आनंद घेतात. प्रत्येक शुक्रवारी अनुभवी डॉक्टर व तंज्ञाचे मार्गदर्शन ठेवले जाते. तर अकॅडमी मध्येही आठवड्यातून एकदा व्यायामाचे महत्त्व, योगासने, आजारापासून मुक्ती, योग्य आहार विहार याविषयी मार्गदर्शन ठेवले जाते.
कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी मुळे २०० सैनिक व सात पोलीस झाले आहेत त्यामुळे जामखेड करांची छाती गर्वाने फुललेली आहे. जामखेड शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवनेरी अकॅडमी आहे. आपल्या मुलांना सैनिक बनवायचे असेल तर उत्तम पर्याय शिवनेरी अकॅडमी आहे.
अकॅडमी मुळे जामखेड करांना आज सकाळी संध्याकाळी येथे फिरण्यासाठी जाॅगींग साठी सुरक्षित ठिकाण झाले आहे. शिवनेरी अकॅडमी, हेल्थ क्लब व कमांडो सिक्युरिटी या तिन्ही युनिट साठी विजय नागरगोजे हे कॅप्टन लक्ष्मण भोरे बरोबर अहोरात्र परिश्रम घेत आहेत म्हणून तर एका वर्षात वीस विद्यार्थी सैन्यात भरती झाले आहेत.
परिसरात कोठेही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर अकॅडमी चे विद्यार्थी मदतीसाठी सर्वात आगोदर हजर आसतात. त्यामुळे अनेक वेळा तहसीलदार व इतर अधिकारी अकॅडमी मधील मुलांची आपत्ती निवारण करण्यासाठी मदत घेतात. विद्यार्थ्यांमधे जिद्द, चिकाटी व मेहनत घेण्याची सवय बिंबवली जाते योग्य सराव व अभ्यास करून घेतला जातो शारीरिक कसरती करुन घेतल्या जातात म्हणून तर सात वर्षांत दोनशे सैनिक तयार करण्याचे काम कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या शिवनेरी अकॅडमीने केले आहे त्यामुळे सैन्यात भरती होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी अकॅडमी मध्ये राज्यातील मुले दाखल होत आहेत. सध्या १५० मुले – मुली प्रशिक्षण घेत आहेत.






