जामखेड नगरपरिषद दुसऱ्या फेरीत गोंधळ,मतदानयंत्र बदलले असा संशय
सतरा सी फार्म वरील सह्या व उमेदवार यांना दिलेल्या फार्म वरील सह्या मध्ये तफावत
जामखेड नगरपरिषद निवडणूक मतमोजणी पहिल्या फेरीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजळ अमित चिंतामणी आघाडीवर होत्या दुसरी फेरी सुरू असताना प्रभाग तीन मधील ईव्हीएम मशीन मध्ये बदल केला असा आरोप करत काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही काळ मतमोजणी थांबली होती.
सतरा सी फार्म वरील सह्या व उमेदवार यांना दिलेल्या फार्म वरील सह्या तफावत आहे. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला आहे. मतमोजणी प्रक्रिया थांबली आहे. बारकोड व नंबर तफावत आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूक सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार रंगतदार लढत होती. सकाळपासूनच मोठी गर्दी मतमोजणी केंद्राबाहेर होती. प्रशासन व पत्रकार यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पत्रकारांना आत प्रवेश नव्हता. बाहेर पत्रकार कक्ष केला होता.
सतरा सी फार्म वरील नंबर मध्ये तफावत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी प्रभाग दहा चे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सय्यद वशिम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सतरा सी फार्म व मशीन मध्ये तफावत आहे. यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.
तीन नंबर नंबर चार नंबर ची पण तक्रार आलेली आहे. यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी बाहेर येत आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या व मशीन बदलले असा आरोप केला जात आहे.
बारा प्रभागासाठी चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीत भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह जवळपास वीस ठीकाणी भाजपा उमेदवार पुढे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील नाहीत. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय साळवे काम पाहत आहेत. नेमके निवडणूक निर्णय अधिकारी का आले नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.