जामखेड नगरपरिषद निवडणूकीत ७५.१२ टक्के मतदान, उद्या कळणार गुलाल कोणाचा पठाण कुटुंबातील तीन पिढीनी केले मतदान

0
1013

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत ७५.१२ टक्के मतदान, उद्या कळणार गुलाल कोणाचा

पठाण कुटुंबातील तीन पिढीनी केले मतदान

जामखेड नगरपरिषद निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार दोन प्रभागातील मतदान शांततेत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब या दोन जागेसाठी निवडणूक झाली
दोन्ही प्रभागात एकुण मतदान ५३६२ होते यापैकी ४०२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे ७५.१२ टक्के मतदान झाले.


एकुण मतदान ५३६२ पैकी ४०२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
प्रभाग दोन ब मध्ये २४४४
प्रभाग चार ब मध्ये १५८४
असे एकुण एकुण ४०२८ मतदान झाले म्हणजे
७५.१२ टक्के मतदान झाले

दोन प्रभागातील निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. आमदार रोहित पवार व सभापती प्रा राम शिंदे, शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी घरोघरी भेटी देत मतदारांना साद घातली होती. मतदार कोणाला कल देणार हे उद्या होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. जनतेचे लक्ष उद्याच्या मतमोजणी कडे लागले आहे. कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपरिषद निवडणूक शांततेत संपन्न झाली

चौकट

पठाण कुटुंबातील तीन पिढ्या मतदानासाठी

मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला शहरातील ल. ना. होशिंग मतदान केंद्रावर पठाण कुटुंबातील तीन पिढ्या चे सदस्य मतदान करताना दिसून आले. पत्रकार नासीर पठाण त्यांच्या मातोश्री व मुलगी यांनी एकत्रित मतदान केले. १) कमरुन्निशा आयुबखान पठाण (आई)
२) नासीरखान आयुबखान पठाण (मुलगा)
3 ) दानिया नासीरखान पठाण ( नात )
यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

चौकट
नवमतदारांनीही केला लोकशाहीचा उत्सव बळकट

मतदानासाठी सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांची रांगा दिसून येत होत्या. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ७५. १२ टक्के मतदानाची नोंद केली. जामखेडमध्ये दिवसभर शांततेत मतदान पार पडले. उमेदवारांनी मतदान कर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरभर जनजागृती केली होती. विशेष म्हणजे, नव्या मतदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव अधिक बळकट केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here