अखेर ट्विटरकडून राहुल गांधींचं अकाऊंट सुरू!!!

0
267
जामखेड न्युज – – – 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट अखेर अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या इतर नेत्यांचंही ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरळीत करण्यात आलं आहे. दिल्लील बलात्कार करुन हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद करत कारवाई केली होती._
काँग्रेसची सर्व अकाऊंट्स अनलॉक
“काँग्रेसची सर्व अकाऊंट्स अनलॉक करण्यात आली आहेत. यासाठी ट्विटरकडून कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही,” अशी माहिती काँग्रेसचे सोशल मीडिया अकाऊंट इन-चार्ज रोहन गुप्ता यांनी दिली आहे. याआधी ट्विटरने बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो शेअर करणं नियमांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं.
ट्विटर खातं बंद करण्याचं कारण काय?
दिल्लीतील नांगल येथे पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल यांनी भेट दिली होती व त्याचे छायाचित्र ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर कंपनीने राहुल यांचे ट्विटर खाते ६ ऑगस्टला बंद केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी ट्विटरच्या ‘हस्तक्षेपा’वर आक्षेप नोंदवत शुक्रवारी टीका केली होती.
राहुल गांधी यांचा संताप
राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरची कारवाई ही राजकीय प्रक्रियेतील हस्तक्षेप आहे. एखादी कंपनी राजकीय परिभाषा ठरवू शकत नाही. ट्विटर खाते बंद करणे हा लोकशाही चौकटीवरील हल्ला आहे. माझे २ कोटी फॉलोअर्स असून त्यांना आपले विचार मांडण्यापासून ट्विटर वंचित ठेवत आहे. आता ट्विटर तटस्थ व्यासपीठ राहिलेले नाही, ते पक्षपाती बनलेले आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.
भाजपा-काँग्रेसमध्ये वादावादी
ट्विटर खाते बंद करण्यावरून राहुल गांधी यांनी ‘ट्विटर-इंडिया’ला लक्ष्य बनवल्यानंतर, या वादात शुक्रवारी भाजपाने उडी घेतली होती. आक्षेपार्ह छायाचित्र ट्वीट केल्यानंतर राहुल गांधी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेऊ शकत नाहीत, अशी टीका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी केली. राहुल यांचे अस्तित्व फक्त ट्विटरवर असून तेही आता बंद झाल्याने ते टीका करत असल्याचा आरोप सूर्या यांनी केल होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here