जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
स्थानकवासी श्र्वेतांबर जैन कॉन्फरन्स दिल्ली या स्थानाकवासी जैन समाजाच्या मातृ संस्था च्या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक मध्ये महाराष्ट्र राज्याची निवडणूक बिनविरोध झाली असून जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची वर्णी लागली असून कोठारी यांची ही तिसरी टर्म आहे
२००५ साली महाराष्ट्र प्रांतीय युवा शाखा पदी निवड झाली होती नंतर २०१६ ते२०१८ भरघोस मताने निवडुन आले तसेच २०१८ते २०२१आणि २०२१ ते २०२३ अशी पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणी पदावर बिनविरोध निवड झाली आहे
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे संस्थे मार्फत विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असल्याने कोठारी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे कोठारी करीत असलेल्या विविध सामाजिक कार्यामुळेच जामखेड चे नाव संपूर्ण देशात गाजत असल्याने ही निवडी जामखेड करांसाठी अभिमानाची गोष्ट आसल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.
या निवडणुकीसाठी चतुर्थ झोन साठी नाशिक, धुळे , जळगाव, नंदुरबार, अकोला ,बुलढाणा, अमरावती, नागपूर, यवतमाळ ,वाशिम ,चंद्रपूर ,गोंदिया वर्धा ,गडचिरोली ,भंडारा ,तसेच अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना, बीड ,उस्मानाबाद ,लातूर ,परळी, परभणी, नांदेड, हिंगोली ,सातारा ,सोलापूर ,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील सभासदांना मतदाराचा अधिकार आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ, राकेश रायसोनी राहता,
राहुल शिंगवी, प्रफुल्ल सोळंकी, सतीशशेठ बोरा, अरूण लटके, ओंकार दळवी, अशोक निमोणकर, संतराम सुळ, संतोष चोरडिया नान्नज, समीरभाई शेख , पप्पूभाई सय्यद, नासीर पठाण, राजकुमार अचलिया, अमोल तातेड, आदित्य मंडलेचा, प्रशांत बोरा ,प्रवीण बोरा ,आनंद नहार ,संजय बोरा ,संजय नहार, संजय कटारिया, हितेश बलदोटा, डॉ.राहुल लद्धड , महावीर सुराणा, आकाश बाफना, अशोक पितळे ,महेश भंडारी, नितीन बोथरा, कैलाश शर्मा, मनोज अशोक भंडारे, हिरालाल बलदोटा,सचिन फिरोदिया, संतोषशेठ चोरड़िया नान्नज, संदीप भंडारी, पंकज भंडारी ,प्रवीणशेठ चोरडिया, मंगेश बेदमुथा , संतोष गर्जे, दिलीपचंद्रजी टाटिया सटाणा, डॉ.जवाहर भळगट, देवेंद्र बोरा ,अभिजीत पोखरणा सिटी केअर हॉस्पिटल, प्रदीप दळवी, सभापती सुभाष आव्हाड , अमोल लोहकरे , धनराज पवार , संतोष गर्जे, बापूसाहेब गायकवाड, अभिषेक खराडे, संजय सानप, सचिन गाडे, आदींनी अभिनंदन केले आहे.
कोठारी यांच्या सामाजिक कार्यामुळे सलग तिसऱ्यांदा जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण राज्यातून अभिनंदन होत आहे.