नृत्यांगनेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड वरून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रणकंदन संदीप गायकवाड नेमका कोणत्या पक्षाचा

0
1657

जामखेड न्युज——
नृत्यांगनेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड वरून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रणकंदन

संदीप गायकवाड नेमका कोणत्या पक्षाचा

कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली गोकुळ पाटील (वय ३५) हिने दोन दिवसांपूर्वी खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आई दुर्गाबाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप गायकवाड हा माजी नगरसेवक असून तो नेमका कोणत्या पक्षाचा यावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलेच रणकंदन माजले आहे तो आमच्या पक्षाचा नाही तो त्या पक्षाचा असा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. भाजपा तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद कार्ले यांनी सांगितले की, तो भाजपाचा नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस चाच आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ कैलास हजारे यांनी सांगितले की, चोराच्या उलट्या बोंबा संदीप गायकवाड यांची पत्नी लता गायकवाड ही प्रभाग पाच मध्ये कोणत्या पक्षाकडून उभ्या होत्या तिच्या प्रचारासाठी सभापती स्वत संदीप गायकवाड बरोबर फिरताना आमच्या कडे व्हिडिओ आहेत.

या आरोप प्रत्यारोपामुळे जामखेड मध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. आत्महत्येप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले होते की: दिपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होते? त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे? त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे, अशी त्यांनी मागणी केली आहे,तसेच, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला होता.

आज याला उत्तर म्हणून भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी सांगितले की, माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड यांनी २०१६ सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग १० मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जिंकली होती. त्यांच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग ०७ मधून निवडून आल्या होत्या होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदिप गायकवाड हे रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदिप गायकवाड यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड यांनी रोहित पवारांचा प्रचार केला होता.

याला उत्तर म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ कैलास हजारे म्हणाले की, चोराच्या उलट्या बोंबा संदीप गायकवाड यांची पत्नी लता गायकवाड या प्रभाग पाच मध्ये भाजप
पक्षाकडून उभ्या होत्या तिच्या प्रचारासाठी सभापती स्वत संदीप गायकवाड बरोबर फिरताना आमच्या कडे व्हिडिओ आहेत. तो भाजपाचाच आहे. हे सर्व जामखेड करांना चांगलेच माहिती आहे.

नृत्यांगनेच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्याकडे सर्वांचे लक्ष
दिपाली पाटीलने आत्महत्या का केली याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉजमधील सीसीटीव्ही, फोन कॉल तपशील आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी या सर्व गोष्टी तपासाचा मुख्य भाग ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here