जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली गोकुळ पाटील (वय ३५) हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (४ डिसें.) उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुलीची आई दुर्गाबाई (कल्याण) गायकवाड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत संदीप सुरेश गायकवाड याने माझ्या मुलीला सतत लग्नाची मागणी करत होता याच त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असावी असे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केले कलम 648 / 2025 BNS108 प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत. आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड यास जामखेड पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची कल्याण (ठाणे) येथील दिपाली पाटील जामखेडमध्ये नृत्यांगना म्हणून कार्यरत होती आणि काही मैत्रिणीं सोबत तपनेश्वर भागात राहत होती. गुरुवारी सकाळी मी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला.
जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद या प्रकरणी दिपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. सकाळी आई आल्यावर आईने माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या नावाने तक्रार दाखल केली
रोहित पवारांचे गंभीर आरोप; सखोल चौकशीची मागणी या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की: दिपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होते? त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत?त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे? त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे, अशी त्यांनी मागणी केली आहे,तसेच, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नृत्यांगनेच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्याकडे सर्वांचे लक्ष दिपाली पाटीलने आत्महत्या का केली याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉजमधील सीसीटीव्ही, फोन कॉल तपशील आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी या सर्व गोष्टी तपासाचा मुख्य भाग ठरणार आहेत.