जामखेड न्युज – – –
देशभरात पोलिस कोठडी दरम्यान सर्वाधिक मृत्यूंत उत्तर प्रदेशला मागे टाकत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर दाखल झाले, तर न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे._
गृह मंत्रालयाची माहिती
पोलिस कोठडीतील मृत्यूंविषयीची माहिती गृह मंत्रालयाकडून नुकतीच राज्यसभेत देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी काळ्या यादीत यावे, ही गोष्ट धक्कादायक आहे.
राज्यसभेत विचारण्यात आला प्रश्न
राज्यसभेत खासदार रामकुमार वर्मा यांनी गृह मंत्रालयाला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. गेल्या तीन वर्षांत पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दरम्यान देशातील वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या मृत्यूंचा आकडा उपलब्ध करून देण्याची मागणी वर्मा यांनी राज्यसभेत केली होती. या प्रश्नाला उत्तर देताना गृह मंत्रालयाने २०२०-२१ साली पोलिस कोठडीत सर्वाधिक मृत्यू गुजरात राज्यात झाल्याचे सांगितले, तर याच कालावधीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले.
गुजरातला कलंकाचा इतिहास जुनाच
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर हे दंगलीच्या बाबतीत जगात बदनाम झाले, तसेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या मुस्लिमांच्या हत्यांवरूनही गुजरातची जगभर नाचक्की झाली होती; परंतु हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाच्या नावाखाली या शिरकाणाची फारशी दखल मोदी यांनी घेतली नव्हती.