जामखेड नगरपरिषद निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. आज तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते जामखेड मध्ये आहेत तरीही जामखेड करांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दोघांच्या भांडणात अनेक कामे रखडली आहेत यामुळेजामखेड करांचा श्वास गुदमरला आहे. तो तिसरी आघाडी मोकळा करणार आहे.
वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शेकाप यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. जामखेड च्या विकासासाठी तसेच आरोग्य, शिक्षण, या मुलभूत प्रश्नांवर तिसरी आघाडी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मैदानात उतरली आहे. यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.
आज नगरपरिषद निवडणुक संदर्भात तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव, काँग्रेसचे राहुल उगले तसेच अरविंद जाधव, वसिम बिल्डर, अन्सार पठाण यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे तिसऱ्या आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जैनब वाहेद कुरैशी, प्रभाग सहा साठी दोन वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव व संगिता भालेराव तसेचप्रभाग पाच काँग्रेस अधिकृत उमेदवार शितल शेलार व पुरस्कृत भारत पवार, प्रभाग आठ प्रभाग काँग्रेसचे राहुल उगले असे उमेदवार आहेत.
यावेळी बोलताना अँड. डॉ. अरूण जाधव म्हणाले की, या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागणार आहेत. आम्ही संविधान मानणारे आम्ही एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे. निश्चितच चांगले यश मिळणार आहे. आम्ही सर्व सामाजिक काम करणारे एकत्र येऊन जामखेड च्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. विकासासाठी आम्ही पाठपुरावा करू असे सांगितले.
आज तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.