अपक्ष आरती सुरज काळे शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवार जाहीर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाची ताकद वाढली – आकाश बाफना

0
710

जामखेड न्युज—–

अपक्ष आरती सुरज काळे शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवार जाहीर

नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाची ताकद वाढली – आकाश बाफना

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत
सुरज काळे यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रींगणानात उतरल्या होत्या, मात्र शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर व शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांच्या प्रयत्नाने त्या शिवसेना पुरस्क्रुत म्हणून निवडणूक लढविणार आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसा राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. याच अनुषंगाने प्रभाग सात मधुन भाजपचे बंडखोर उमेदवार सुरज काळे यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर व शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांच्या प्रयत्नाने त्यांना शिवसेनेच्या वतीने पुरस्क्रुत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर म्हणाले की जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग सात (अ) मधुन आरती सुरज काळे यांना पुरस्क्रुत उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. त्यांच्या जोडीला आमच्या पक्षाचे सहकारी अण्णा ढवळे सात (ब) म्हणून उभे राहिले आहेत या दोघांचे मी स्वगत करतो.

यानंतर आकाश बाफना यांनी बोलताना सांगितले की आम्ही काही दिवसापासुन सुरज काळे यांच्या संपर्कात होतो. शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर यांचे जवळचे आहेत. सुरज काळे हे देखील पहीलेच शिवसैनिक आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. जामखेड शिवसेना शिंदेगटाच्या वतीने आरती सुरज काळे यांना शिवसेना पुरस्क्रुत घोषित केल्याने या निवडणुकीत आमच्या शिवसेना पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे. सुरज काळे यांचा शहरासह प्रभागात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे प्रभाग सात मधिल शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास आकाश बाफना यांनी व्यक्त केला आहे. यावेळी निवडणूकीत उभ्या राहिलेल्या शिवसेना शिंदेगटाच्या नगराध्यक्षा पायलताई आकाश बाफना, शिवसेनेचे उमेदवार प्रविण बोलभट, आण्णा ढवळे, राजमुद्रा युवा मंचचे अध्यक्ष आकाश बारहाते, करण ओझर्डे सह राजमुद्रा युवा मंचचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

प्रभागात दांडगा संपर्क

सुरज काळे हे गेली आनेक वर्षांपासून राजकारण सक्रिय आहेत. त्यांनी राजमुद्रा युवा मंचाची स्थापना करुन युवकांची मोट बांधली आहे. पुर्वी शिवसेना उबाठा गटाचे ते युवा तालुका प्रमुखपदी काम केले आहे. नंतर भाजप मध्ये प्रवेश करुन नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप कडुन उमेदवारी करण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर प्रभाग सात (अ) मधुन शिवसेना शिंदे गटा कडुन सध्या पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here