Monday, March 2, 2026
Home ताज्या बातम्या आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश

आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश

0
1668

जामखेड न्युज—–

आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश

आदिवासी पारधी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच इतर समाजातील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले, आदिवासींना खावटी कर्ज, मोठ्या प्रमाणात घरकुले, तसेच समाजातील मुलांच्या शैक्षणिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबविणारे पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकाश काळे यांनी शरदचंद्र पवार यांना तसेच जामखेड तालुक्यात ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांना नेता मानत आतापर्यंत एकनिष्ठ काम केले. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग पाच हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला होता या प्रभागात प्रकाश काळे यांनी तयारीही सुरू केली होती. आतापर्यंत आपण एकनिष्ठ आहोत त्यामुळे तिकीट मिळेलच ही खात्री होती. पण प्रकाश काळे यांना तिकीट नाकारले व आयात उमेदवाराला तिकीट दिले यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस चा त्याग करत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रकाश काळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून धान्य दुकान चालवताना अनेकांचा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत सामावेश करून त्यांना धान्य मिळवून देण्याचे काम केले. अनुसूचित जमातीसाठी अहोरात्र काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे.

जामखेड न्युजशी बोलताना प्रकाश काळे म्हणाले की, आतापर्यंत मी निष्ठेने काम केले आणी मला तिकीट नाकारले व आयात उमेदवाराला तिकीट दिले हेच का माझ्या निष्ठेचे फळ यामुळे नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रकाश काळे यांना मानणारा वर्ग सर्वच समाजात आहे विषेशतः अदिवासी समाजात काळे यांना नेता मानतात पाच नंबर प्रभागात आरक्षणही अनुसूचित जमातीचे साठी असताना कामही असताना निष्ठा असताना उमेदवारी नाकारली यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

कालच निष्ठावंत कार्यकर्ते उमरभाई कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिली होती आज प्रकाश काळे यांनी यामुळे पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते यांना किंमत नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!