जामखेड नगरपरिषद निवडणुक ताकतीने लढवून सर्वच्या सर्व जागा जिंकू – प्रा मधुकर राळेभात
पहा कोण आहेत भाजपाचे उमेदवार
जामखेड नगरपरिषद निवडणुक मोठ्या ताकतीने लढवून नगराध्यक्षासह सर्व च्या सर्व जागा जिंकू असा कारण भाजपाने सर्व माणसातील लोकांचे काम करणारे उमेदवार दिले आहेत त्यामुळे चांगले यश मिळवून सभापती प्रा राम शिंदे यांचा विश्वास संपादन करू असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.
आज जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाने आज पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदाच्या २४ उमेदवार जाहीर केले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद कार्ले, यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, सोमनाथ पाचारण, शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, कांतीलाल वराट, केदार रसाळ, अल्ताफ शेख, उद्धव हुलगंडे, राहुल बेदमुथ्था, ऋषिकेश मोरे यांच्या अनेक भाजपा पदाधिकारी व सर्व उमेदवार हजर होते.
यावेळी अमित चिंतामणी यांनी सर्वाचे स्वागत करत संजय काशिद यांनी उमेद्वारांची नावे जाहीर केले.
भाजपाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी
नगरसेवक पदासाठी पुढील उमेदवार आहेत प्रभाग एक-अ) सुमन अशोक शेळके ब) श्रीराम आजीनाथ डोके
प्रभाग दोन- अ) प्रविण विठ्ठल सानप ब) कमल महादेव राळेभात