जामखेडमध्ये नगरपरिषद निवडणूकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये मुस्लिम समाज नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा करणार
जामखेडमध्ये नगरपरिषद निवडणूकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये
मुस्लिम समाज नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा करणार
जामखेड नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सभापती प्रा राम शिंदे यांनी दोन दिवस जामखेड मध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या ही मुलाखती सुरू आहेत. तिसरी आघाडी याचेही खलबते सुरू आहेत. याच वेळी आज जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार उभा केला जाईल त्यामुळे सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी आम्हाला गृहीत धरू नये असे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी यांनी सांगितले.
जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज मुस्लिम पंचकमिटी व मुस्लिम समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील शेकडोंच्या संख्येने मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अझरभाई काझी म्हणाले की, आतापर्यंत फक्त आमच्या मतांचा वापर केला जातो आता आम्ही तसे होऊ देणार नाहीत. आमचा सर्व समाजाचा एकमुखी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित करू असे सांगितले.
यावेळी बोलताना सर्व समाजाच्या वतीने अझरभाई काझी म्हणाले की, आजपर्यंत आम्ही सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्व पक्षांना मदत केली आहे. भाजप मधील अनेक उमेदवारांना निवडणूक आणले आहे तरीही मुस्लिम समाज भाजपाला मतदान करत नाही असे भासवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्न संतोषी करतात.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने आमच्या समाजातील कोणत्याही उमेदवारास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी आम्ही त्यास निवडून आणू शेजारी आष्टी, पाटोदा तालुक्यात उमेदवारी मिळते मग जामखेड मध्ये का नाही असा प्रश्न विचारला. आता आम्ही कोणाच्याही मागे राहणार नाहीत. आमचा स्वतंत्र उमेदवार उभा करू असे सांगितले.
मुस्लिम समाजातील उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी घ्यावी आमची काहीही हरकत नाही. फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा स्वतंत्र उमेदवार राहिल आमच्या समाजाचे साडेसात हजार मते आहेत. आणी इतर अल्पसंख्याक समाज आमच्या बरोबर आहे. आम्ही निवडून येणार आहोत.
चौकट
आम आदमी पार्टीने सर्वात प्रथम मुस्लिम समाजातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला याविषयी बोलताना काझी म्हणाले की, आम आदमी पार्टीचा उमेदवार भाजपाची बी टिम आहे. भाजपानेच तो उमेदवार उभा केला आहे. यामुळे त्यांच्या वर कोणीही विश्वास ठेवणार नाही.