शिवाजी (गुड्डू) विटकर यांच्या तर्फे प्रभाग तीन मध्ये किराणा किटचे वाटप
दिवाळीनिमित्त प्रभाग तीन मधील गरजू कुटुंबांनासामाजिक कार्यकर्ते व युवा नेते शिवाजी (गुड्डू) विटकर यांच्या तर्फे किराणा किटचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की साखर, हरभरा डाळ, गरा, तेल, गूळ, साबण, तेल आणि यांसारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. यामुळे प्रभागातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होणार आहे.
प्रभागातील राम मंदिर परिसर, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, सुतार गल्ली परिसर यासह अनेक ठिकाणी शिवाजी विटकर यांच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामुळे माताभगिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
किराणा किटचे वाटप करताना शिवाजी (गुड्डू) विटकर, शिवाजी आरेकर, ऋषिकेश गायकवाड, प्रमोद दाणी, बापू मोहळकर, मंगेश राजगुरू, ओम राजगुरू, दिपक निमोणकर, दिनकर राजगुरू, तुकाराम निमोणकर, अर्जुन आसळकर, गणेश जोशी यांच्या सह अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात माता भगिनी उपस्थित होत्या.
शिवाजी (गुड्डू) विटकर यांनी प्रभाग तीन सह शहरातील अनेक भागात सामाजिक कार्य करत प्रभागात एक कामाचा माणूस म्हणून आपला ठसा उमटवला आहे. नागरिकांच्या सुख दु:खात नेहमीच पुढे असतात.
जामखेड शहरातील राम मंदिरासमोरील खुपच जुने अंदाजे दिडशे वर्षापेक्षा जास्त वयाचे पिंपळाचे झाड आतून पोखरले होते. जवळून विज कनेक्शन गेलेले होते. जवळ घरे आहेत. यामुळे वारे वादळात या झाडाचा धोका निर्माण झाला होता. दिड वर्षापासून शासन पातळीवर प्रयत्न सुरू होते पण यश मिळत नव्हते. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी (गुड्डू) विटकर यांनी पुढाकार घेत परिसरातील नागरिकांच्या परवानगीने झाड उतरून घेतले यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अशा प्रकारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा कार्यकर्ते शिवाजी (गुड्डू) विटकर हे प्रभागातील जनतेला आपला हक्काचा कामाचा युवा वाटत आहे.