Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या वीज कर्मचारी संपावर, जामखेड शहरातील अनेक भागातील बत्ती गुल

वीज कर्मचारी संपावर, जामखेड शहरातील अनेक भागातील बत्ती गुल

0
1090

जामखेड न्युज—–

वीज कर्मचारी संपावर, जामखेड शहरातील अनेक भागातील बत्ती गुल

महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांचे सुरू असलेले खाजगीकरण, इतर धोरणात्मक विषय व निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने आजपासून संपावर आहेत. आणि जामखेड शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांना आक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे.

जामखेड शहरातील मार्केट यार्ड डीपी वरील सकाळपासून लाइट बंद आहे. याबाबत महावितरण कार्यालयात फोन केला असता ते म्हणतात कर्मचारी संपावर आहेत. फक्त कामावर तीन जण आहेत अनेक ठिकाणी अडचणी आहेत. उद्या पासून तर सर्वच संपावर आहेत. त्यामुळे लाइट कधी येणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे.

जामखेड शहरातील मार्केट यार्ड डीपी वरील तार तुटलेली आहे. अर्बन जामखेड लाइट अडचण तसेच कब्रस्थान डीपी वरील तार तुटलेली आहे. या नागरिकांना आक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. आँफिसमध्ये सांगण्यात आले की, मानसे कामाला नाहीत. आम्ही काही करू शकत नाही.

क्रमबद्ध आंदोलन चौथा टप्पा नुसार आज दिनांक 1/10/25 रोजी जामखेड उपविभागामध्ये 1.30 वाजता गेट मीटिंग घेण्यात आली गेट मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते
तसेचशिवाजी कदम सचिन चोरगे लखन फाळके भरत नाईकनवरे सुभाष वाघ व सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज उद्या परवा 72 तासांचा संप पुकारण्यात आला आहे.

या आहेत मागण्या

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीच्या खाजगीकरणाला विरोध
महावितरण एकतर्फी पुनर्रचनेला विरोध
राज्य शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना लागू करावी

पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे
रिक्त पदे भयती करावित
कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे यासह विविध मागण्यासाठी संप पुकारण्यात येणार आहे.

आंदोलन या प्रमाणे
6 आक्टोबर मुख्य अभियंता यांच्या दारात ठिय्या आंदोलन
7 आक्टोबर झोन मंडळ विभाग कार्यालयासमोर द्वारसभा
9 आक्टोबर ते 11 आक्टोबर तीन दिवसांचा 72 तासांचा संप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!