अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे पंचनामे करून मदत मिळाली – आदर्श फाऊंडेशन

0
492

जामखेड न्युज—–

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे पंचनामे करून मदत मिळाली – आदर्श फाऊंडेशन

सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणाऱ्या आदर्श फाऊंडेशनने आता अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व व्यावसायिक यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. व मदत मिळाली म्हाणून विनंती करण्यात आली आहे. यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, उपाध्यक्ष अमित चोपडा, सचिव निलेश पारख यांच्या सह अनेक शेतकरी, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदर्श फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व नागरिक आपणास कळवितो की मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिक व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून सर्व नुकसानग्रस्तांचे आपण तातडीने पंचनामे करावेत.

तसेच शेतकऱ्यांना कर्ज माफीसह इतर सर्व योजना त्वरित लागू कराव्यात यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे सामान्य नागरिकांचे कष्टकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे नुकसान पुढील भविष्यामधील जडणघडणी वर मोठे परिणामकारक आहेत त्यामुळे आपण नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करावे हीआपणास विनंती आहे.

खालील प्रमाणे आमच्या मागण्या आपण वरिष्ठ पातळीवर पाठवून दखल घेण्यास सांगावी
1- पावसामुळे हातात तोंडाशी आलेल्या सोयाबीन उडीद व तुर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्वरित मदत मिळावी
2- अतिवृष्टीमुळे कांदा चाळीत पाणी जाऊन सर्व कांदा सडला आहे त्याचेही पंचनामे होऊन मदत मिळावी. 

3-नवीन लागवड केलेल्या कांदा पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत.
4-ओढे नाले व बंधारे फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अत्याचेही पंचनामे होऊन भरपाई अनुदान मिळावे.

5- घर गोठे व भिंती पडून सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही तातडीने मदत मिळावी
6- पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गोधनाचेही पंचनामे व्हावेत.या विविध अशा मागण्यांचे आम्ही या ठिकाणी आपणास निवेदन देत आहोत तरी आपण त्वरित यावर उपाययोजना करून तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करून मदत करावी ही विनंती.

अशा प्रकारे जामखेड परिसरातील अतिवृष्टीग्रस्त च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दित वरील मागण्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here