Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला, पुल पाण्याखाली, नऊ जनावरे...

जामखेड तालुक्यात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला, पुल पाण्याखाली, नऊ जनावरे दगावली, अनेक घरांची पडझड

0
1304

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला, पुल पाण्याखाली, नऊ जनावरे दगावली, अनेक घरांची पडझड

जामखेड तालुक्याला अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. जामखेड- तुळजापुर मार्गावरील दरडवाडी, आनंदवाडी, राजुरी पुल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना महापुर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, अनेक गावातील पुल पाण्याखाली गेले आहेत, आतापर्यंत तालुक्यात नऊ जनावरे दगावली आहेत, अनेक घरांची पडझड झाली आहे. पीके पाण्यात आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

साकतच्या लेंडी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी आहे.त्यामुळे कोल्हेवाडी, शिवनगर, कडभनवाडी, नेमाने वस्ती, वराट वस्ती या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. पीके पुर्णपणे पाण्यात आहेत. शेतात तळे झाले आहे.

जामखेड तुळजापूर वाहतूक बंद आहे. तसेच साकत, नान्नज, जवळा, खर्डा, धामणगाव, तेलंगशी, जवळका येथील नदीच्या पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आसपासच्या वाड्या वस्तीचा संपर्क तुटला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी साहस करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खैरी नदीला पूर आला आहे दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडी चा पूल बंद आहे. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.


बांधखडकचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील पावसाने दैनिय अवस्था झाली आहे. नाहुली भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, पिंपळगावउंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता. शेती, पीके, पशुधन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तालुक्यात नऊ जनावरे दगावली आहेत.
लेहनेवाडी येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या मृत्यूमुखी भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गायवाहून गेली तर मोहा येथील कैलास सजगणे यांची १ मेंढी ओढ्यात वाहून गेली आहे. अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक

सावरगाव, घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव, वाघा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. जवळके येथील हनुमान मंदिर पाण्यात गेले आहे. जोरदार पाऊस सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!