Monday, September 28, 2026
Home ताज्या बातम्या आकाश बाफना यांच्या मोफत मोहटादेवी दर्शनाचा पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार महिलांना...

आकाश बाफना यांच्या मोफत मोहटादेवी दर्शनाचा पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार महिलांना लाभ आकाश बाफना यांचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद – प्रा. मधुकर राळेभात

0
511

जामखेड न्युज—–

आकाश बाफना यांच्या मोफत मोहटादेवी दर्शनाचा पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार महिलांना लाभ

आकाश बाफना यांचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद – प्रा. मधुकर राळेभात

आदर्श फाऊंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी शहरातील माता भगिनींना मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन करुन देवीचं दर्शन घडवून आणण्याचे पुण्याचे काम केले हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी काढले.

शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत दर्शन यात्रेचे आयोजन आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक आकाश दिलीप बाफना यांच्या वतीने यावर्षी विशेष आयोजन करण्यात आले. आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात व जिल्हा उपाध्यक्ष ॲड अजय काशिद यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना प्रा.राळेभात म्हणाले की,बाफना यांना सामाजिक वारसा वडील दिलीप बाफना यांच्याकडून मिळाला असून दिलीप बाफना हे पंढरीची वारी चांगल्या पद्धतीने पार पाडत होते.गेल्या ३० वर्षांपासून सेवा कार्य करत आहेत.सामुहिक कुटुंबाचा वारसा लाभला होता.त्याच अनुषंगाने आकाश बाफना यांनी माता भगिनींना दर्शनाचा योग आणून दिला आहे.बाफना यांच्या हातून पावित्र्याचं कार्य होत आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड अजय काशिद,नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, महेश नगरे, युवा नेते मोहन देवकाते, आण्णा ढवळे, तात्याराम पोकळे, प्रवीण बोलभट,हनुमंत निकम (महाराज)तसेच भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई पवार, वैशालीताई शिंदे,मिराताई तंटक,निशाताई पवार आदी महिला व भाविक भक्त तसेच निलेश पारख,अमित पारख, शुभम बोरा,निखिल भंडारी, प्रफुल्ल सोळंकी,

निखिल बोथरा, सनी पितळे, शुभम छाजेड,अशोक कुमटकर, अमित चोरडिया,परशुराम भांगे, बाळासाहेब नवसरे, अख्तर शेख,अमित पिपाडा आदी आदर्श फाऊंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील नवीन पोलीस स्टेशन समोरून वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुमारे ५० गाड्या मोहटादेवीच्या दर्शनासाठी रवाना झाल्या.तसेच दर्शनानंतर महिलांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली.

चौकट
———————————————–
दि.२४ व २५ सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच शहरातील साधारण २००० महिलांना मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचा लाभ मिळाला असून महिलांनी आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना यांचे मनापासून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!