मोहरी तलाव सांडव्याला मोठे भगदाड, दरडवाडी पुलाची दैनिय अवस्था, दोन्ही बाजूंनी खच
तालुक्यातील मोहरी तलाव सांडव्याला मोठे भगदाड पडले असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तलावाखालील गावे, वस्ती यांना धोक्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिर्डी जामखेड तुळजापूर महामार्गावरील खर्डा जवळील दरडवाडी पुलाची दैनिय अवस्था झाली आहे दोन्ही बाजूंना भगदाड पडले असून मोठ्या प्रमाणावर डांबर उखडली आहे. यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मोहरी तलावाचा सांडवा खूप डॅमेज झाला आहे आणि आत्ता पण मोहरी येथे पाऊस खूप चालू आहे परंतु आपण अफवावर विश्वास ठेवू नकामोहरी तलावाखालील सर्व गावे जसे ढाळे वस्ती, पांढरेवाडी, दरडवाडी, बाळगव्हाण आदी नदी काठील सर्व यांनी सतर्क राहावे असे आवाहन मोहरीचे सरपंच हनुमान बारगजे मेजर यांनी केले आहे.
शिर्डी( जामखेड) तुळजापूर महामार्गावरील खर्डा जवळील दरडवाडी पुलाची दैनिय अवस्था झाली आहे. हे पाहण्यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उज्जवलसिंह राजपूत तसेच सरपंच वैजनाथ पाटील यांनी भेट देत पाहणी केली व जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी उज्ज्वलसिंह राजपूत म्हणाले की, गेल्या पाच दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. मोहरी तलावातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या वेगामुळे पुलाची दैनिय अवस्था झाली आहे. पुलावरील डांबर मोठ्या प्रमाणावर उखडली आहे. तेव्हा जामखेड तुळजापूर महामार्गावरील दरडवाडी रस्ता ऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.
दि.23/09/2025, सकाळी 6.00 वा. 1) सीना नदी – सीना धरण विसर्ग क्युसेक 14,329 क्युसेक. 2) खैरी धरण विसर्ग- 16,414 क्युसेक.सुरू आहे
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे यामुळे अनेकांच्या घरात पाणी तसेच शेतीत पाणी आहे पीके पाण्यात आहेत लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.