नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पुढाकारातून नवरात्र उत्सवाचा अनोखा सोहळा
विविध कार्यक्रमांचे भव्य दिव्य असे आयोजन
जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पुढाकाराने यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. जामखेड शहरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ माता भगिनींनी घ्यावा असे आवाहन अमित चिंतामणी व प्रांजल चिंतामणी यांनी केले आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महिला भगिनींना दिनांक २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २२ सप्टेंबर, सायंकाळी ७.०० वाजता श्री विठ्ठल मंदिर येथे घटस्थापनेचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार, २३ सप्टेंबरला दुपारी २.०० वाजता सप्तशतीचे पाठ व कुंकूमार्चन, बुधवारी २४ सप्टेंबर सकाळी ११.०० वाजता मोहटादेवी दर्शन (श्री क्षेत्र मोहटादेवीगड), गुरुवारी २५ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता रासदांडिया गरबा आयोजित आहे.
शनिवार, २७ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता कुमारीका पूजन, रविवार, २८ सप्टेंबर दुपारी ५.०० वाजता कुमारीका पूजन व सायंकाळी ७.०० वाजता पारंपरिक वेषभूषा स्पर्धा (श्री जगदंबा देवी मंदिर व श्री विठ्ठल मंदिर) आयोजित आहेत. सोमवार, २९ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता विविध कलागुण स्पर्धा तसेच वयोगट ५ ते १५ वर्षांमध्ये व्यक्तीगत व समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत.
सदर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संगीतखुर्ची व वेषभूषा स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक असून ती विनामूल्य राहणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.