जामखेड शहरात कोयता गँगची दहशत निर्माण होत आहे. नेहमीच लहान मोठे भांडणे सुरू आहेत यात जीवघेणे हल्ले होत आहेत मात्र पोलीसांत तक्रार दाखल होत नाहीत. तसेच तक्रार दाखल करताना मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव येतो यामुळेही तक्रार दाखल होत नाहीत. मात्र दिवसाढवळ्या मारामाऱ्या, कोयत्याने वार ही दहशत रोखण्याचे जामखेड पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस कानात कापसाचे गोळे घालून करत होते ड्युटी
एकेकाळी शांत असणारे जामखेड आता वेगवेगळ्या लहान मोठ्या टोळ्या मुळे दहशतीखाली आहे. पोलीसांना कायद्यानुसार काम करता येत नाही. राजकीय दबाव येतो. गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्रास डीजेचा दणदणाट सुरू होता. लेझर लाईटला बंदी असताना अनेक मंडळाच्या लेझर लाईटचा झगमगाट सुरू होता. सर्व नियम पायदळी तुडवले जात होते. बिचारे पोलीस कानात कापसाचे गोळे घालून आपली ड्युटी करत होते. याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्व सामान्य जनतेपुढे आहे.
पोलीसांपुढे कोयत्याची पिशवी
गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात किरकोळ बाचाबाची सुरू झाली आणि दगडफेक कोयते काढण्यात आले. यात काही जण गंभीर जखमी देखील झाले आणी चक्क पोलीस निरीक्षक यांच्या जवळ कोयत्याने भरलेली पिशवी पडली यानंतर पोलीसांनी लाठीहल्ला करत जमावांवर नियंत्रण मिळवले मात्र तरीही सर्व काही अलबेल आहे. कोणीच कोणाविरोधात तक्रार दाखल केली नाही. सर्व सामान्य जनता मात्र दहशतीखाली वावरत आहे.
बॅनर ठरतायेत वादाचे कारण
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर बॅनर युद्ध सुरू आहे. यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण होत आहे. एकमेकांच्या खुन्नस वर बॅनर लावणे, एकमेकांचे बॅनर फाडणे यामुळे शहरात वाद होत आहेत.
दररोज बॅनर भाडे आकारावे
नगरपरिषदेने बॅनर बंदी करावी किंवा परवानगी देताना मोठ्या प्रमाणावर दररोज रक्कम आकारावी. जेने करून नगरपरिषद उत्पन्नात वाढ होईल तसेच बॅनर संख्या कमी होईल.
एकेकाळी बॅनर मुक्त झाले होते जामखेड
बॅनर वादातून जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर भांडणे वांदग झाले होते. यामुळे सर्व जनतेने समोर येत एक वर्ष जामखेड बॅनर मुक्त केले होते तसेच आता परत करणे आवश्यक आहे.
अवैध हत्यारे रोखण्याचे पोलीसांपुढे आव्हान
परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध हत्यारे आहेत. अनेक टोळ्यातील कार्यकर्ते राजरोसपणे कमरेला बंदुकी लावून फिरतात परिसरात दहशत निर्माण करतात. यातून भांडणे होतात हे रोखण्याचे आव्हान जामखेड पोलीसांपुढे आहे.