आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून होणार मिलिंद नगर भागातील तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार

0
453

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून होणार मिलिंद नगर भागातील तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बाफना कुटुंबिय यात आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी मोठी भर घातली आहे. शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवत आपला आदर्श निर्माण केला आहे.
गणेश मंडळाच्या सन्मानानंतर आता मिलिंदनगर भागातील तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी आकाश बाफना पुढे सरसावले आहेत.

मिलींदनगर येथील जागृत देवस्थान जय तुळजाभवानी मंदीर येथील मंदीर जिर्णोधार आकाश बाफना आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहेत यामुळे परिसरातील भाविक भक्तांना आनंद झाला आहे.

मिलींगनगर येथील जय तुळजाभवानी मंदीराचे काम अनेक दिवसापासून रखडलेले होते व नवरात्री समोर असतांना जीर्णोद्धार व मंदीर स्लॅब व इतर कामांसाठी निधीअभावी काम थांबलेले होते.

ही बाब मिलींदनगर परीसरातील नागरीकांनी आकाश जी बाफना यांनी कळवली त्यांनी पाहणी करताच त्यांनी त्वरीत काम पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व नवरात्रीपर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास दिला सदरील निधी हा मंदीरचे पुजारी रामदास गायकवाड यांच्या कडे त्वरीत सुपूर्त केला.

यावेळी उपस्थीत आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीपजी बाफना, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, सामाजीक कार्यकर्ते किरण शेठ वडे, धिरज चव्हाण, रामदास गायकवाड, आरिफ शेख, बांबु गायकवाड, आण्णा पवार, बाबासाहेब साठे, बाबासाहेब सदाफुले,संदीप गायकवाड, रिजवान शेख, रमेश गायकवाड, आण्णा गायकवाड, विलास गायकवाड, आबा समुद्र,निलाबाई गायकवाड, आशाबाई समुद्र,आस्मा शेख, सलमा शेख, मंगल गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आकाश बाफना यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेतल्यामुळे परिसरातील भाविक भक्तांनी आकाश बाफना यांचे आभार मानले. व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here