रयत च्या सुरक्षा व भौतिक सुविधा समितीवर अँड. ऋषिकेश डूचे यांची निवड
शासन निर्णयाप्रमाणे गठित करण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील नागेश विद्यालयाच्या विध्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समितीच्या कायदेशीर सल्लागार सदस्यपदी सुप्रसिद्ध ऍड ऋषिकेश डूचे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शासन निर्णयाप्रमाणे सुरक्षा व भौतिक सुविधा समिती ही शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधांशी संबंधित कामांची देखरेख करते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे, सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करणे समाविष्ट आहे.
इयत्ता १ ते १२ च्या शाळांमध्ये ही समिती असणे बंधनकारक असून ती दर दोन वर्षांनी पुनर्गठित केली जाते आणि त्यात मुख्याध्यापक, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्थानिक प्रतिनिधींचा समावेश असतो.
त्याप्रमाणे शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात सुरक्षा व भौतिक सुविधा समिती गठीत केली असून यामध्ये कायदेशीर सल्लागार सदस्यपदी ऍड ऍड ऋषिकेश मोहन डूचे यांची निवड करण्यात आली.
या समितीमध्ये तहसीलदार,पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर,वकील ,प्रतिष्ठित नागरिक याचा समावेश असतो,ऍड डूचे यांच्या निवडीचे पत्र नागेश विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके यांनी दिले, या निवडीबद्दल तालुका वकील संघ,पत्रकार संघ,आजी माजी शिक्षक,विधार्थी यांनी अभिनंदन केले.