जामखेड पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबु योजनेचा सराव व रूट मार्च सादरीकर
गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद सण शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावा या उद्देशाने जामखेड पोलीस स्टेशनने शहरात दंगा काबु योजनेचा सराव व रूट मार्च सादरीकरण केले.
आज दिनांक 04 .09.2025 रोजी सकाळी 09.00 ते 11.00 दरम्यान गणेश उत्सव 2025 व ईद ए मिलाद च्या अनुशंगाने जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत
जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुक मार्गाने,जामखेड पोलीस स्टेशन ,बीड कॉर्नर, मेन पेठ, संविधान चौक, तपनेश्वर रोड , भुतडा रोड , बीड रोड, खर्डा चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत रुट मार्च घेण्यात आला व खर्डा चौक जामखेड येथे दंगा काबु योजनेचा सराव घेण्यात आला.
रुटमार्च आणि दंगा काबु योजनेकरीता पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च करीता, एपीआय नंदुरबार सोनवळकर, एपीआय वर्षा जाधव, एपीआय गावडे, परिविक्षाधिन पीएसआय चव्हाण सोबत
जामखेड पोलीस स्टेशनचे 42 पोलीस अंमलदार, व 52 होमगार्ड हजर होते.