न्यु इंग्लिश स्कूल राजुरीचा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात द्वितीय क्रमांक
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयाने माझी सुंदर शाळा उपक्रमात जामखेड तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यामुळे विद्यालय प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत टप्पा दोन मध्ये झालेल्या मूल्यांकनामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.
यानिमित्त दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उद्धव (बापू) देशमुख (अध्यक्ष),दिलीप शेठ गुगळे (उपाध्यक्ष), मा श्री अरुण (काका) चिंतामणी (सचिव), मा श्री सुनील कटारिया (सहसचिव),मा श्री शरद देशमुख (खजिनदार), तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड व सर्व स्टाफ, तत्कालीन मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.
पंचायत समिती जामखेड या ठिकाणी पुरस्काराचे वितरण झाले. शुभम जाधव गटविकास अधिकारी जालिंदर खताळ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते प्रवीण गायकवाड मुख्याध्यापक यांनी पुरस्काराचा धनादेश स्वीकारला. यावेळी सुरेश मोहिते (केंद्रप्रमुख -राजुरी) राम निकम (केंद्रप्रमुख जामखेड ), विक्रम बडे (केंद्रप्रमुख अरणगाव) सुनील भामुद्रे मामा उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शैक्षणिक वर्ष 2024-25 या उपक्रमांतर्गत झालेल्या मूल्यांकनामध्ये न्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला. यासाठी सागर कोल्हे (सरपंच)मा श्री दत्तात्रय मोरे (पोलीस पाटील) बाळासाहेब माने ,(शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष)श्री भाऊसाहेब काळदाते (पालक शिक्षक संघ- उपाध्यक्ष) तसेच ग्रामस्थ,पालक, शिक्षण प्रेमी , शिक्षण तज्ञ व माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात बाळासाहेब पारखे (मुख्याध्यापक),राजेंद्र पवार , गौतम हुलगुंडे श्रीमती सुनीता पिसाळ दीपक सुरवशे सुभाष बोराटे बाबासाहेब समुद्र, उमराव लटपटे श्री नवनाथ सदाफुले हनुमान राऊत विद्यालयातील सर्व विद्यार्थी याच्या प्रत्येक प्रयत्नाने विद्यालयाला हा पुरस्कार मिळाला. सर्व स्तरातून विद्यालयाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.