राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांची PM eVidya DTH चॅनलच्या टेक्निकल समन्वयक पदी निवड

0
378

जामखेड न्युज—–

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांची PM eVidya DTH चॅनलच्या टेक्निकल समन्वयक पदी निवड

शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य आणि डिजिटल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार विजेते तसेच राष्ट्रीय आयसीटी ॲम्बेसेडर असलेले जि. प. प्राथमिक शाळा सरदवाडी ता.जामखेड येथील शिक्षक श्री. रवींद्र भापकर यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रतिष्ठित PM eVidya DTH चॅनलच्या टेक्निकल समन्वयक पदी निवड झाली आहे.

PM eVidya हा भारत सरकारचा सर्वसमावेशक शैक्षणिक उपक्रम असून, देशभरातील विद्यार्थ्यांना इंटरनेट असो वा नसो, टीव्हीवरील फ्री टू एअर DTH चॅनल्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पातील टेक्निकल समन्वयक म्हणून श्री. भापकर यांचे कार्य डिजिटल प्रसारणाचे नियोजन, तांत्रिक सहाय्य, ई-कंटेंट गुणवत्ता नियंत्रण आणि शिक्षक-विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षण उपलब्ध करून देणे यावर केंद्रित असेल.

श्री भापकर यांना यापूर्वीच भारत सरकारने सर्वोच्च राष्ट्रीय आयासिटी पुरस्काराने सन्मानित केले असून सध्या ते राष्ट्रीय आयासिटी अँम्बेसीडर , नॅशनल जुरी मेंबर फॉर सायबर सेक्युरीटी, नॅशनल सायबर अँम्बेसीडर, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे थिंक टँक सदस्य तसेच राज्य व राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

तसेच त्यांना यापूर्वीच महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर व सोशल मीडिया महामित्र या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. भापकर यांची निवड ही त्यांच्या दीर्घकालीन तांत्रिक कौशल्य, ई-कंटेंट निर्मितीतील प्रावीण्य आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सुलभ डिजिटल शिक्षण साधने विकसित करण्याच्या यशस्वी प्रयत्नांचा गौरव आहे.

श्री. भापकर यांची PM eVidya DTH चॅनल च्या टेक्निकल समन्वयक म्हणून निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून, महाराष्ट्रातील शिक्षक आणि डिजिटल शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी उपलब्धी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here