भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तिरंगा रॅली – संजय काशिद
तिरंगा रॅलीने दुमदुमले जामखेड शहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी याच बरोबर तरूणांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी जामखेड शहरात भाजपा मित्र पक्षाच्या वतीने भव्य दिव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे बोलत होते.
यावेळी बोलताना ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे म्हणाले की, आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली याचे स्मरण आवश्यक आहे. हे युवा पिढीला माहिती व्हावे प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीरॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद म्हणाले की, भाजपा मित्र पक्षासह अनेक देशभक्त तरूण या रॅलीत उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत. आँपरेशन सिंदुर ने आपण पाकिस्तान ला चांगलाच धडा शिकवला भारतीय सैन्य दलाच्या या साहसी कारवाईला समर्थन देण्यासाह त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जामखेड शहरात आज भव्य दिव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
तिरंगा यात्रेचा मार्ग शासकीय विश्रामगृह नगर रोड- खर्डा कॉर्नर – तपनेश्वर रोड- धर्मयोद्धा चौक – मिलिंद नगर बीड रोड – बीड कॉर्नर- जय हिंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज मेन पेठ – लक्ष्मी चौक (संविधान स्तंभ)- खर्डा चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे, शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हातात तिरंगा घेत मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
तसेच आज सायंकाळी अखंड भारत संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम ‘अखंड भारत’ ही संकल्पना जाहीरपणे मांडली आहे. भारतीय जनता पार्टीकडूनजाहीरपणे समर्थन करण्यात आले आहे. राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.