जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
अहमदनगर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)समूहातर्फे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा समूहाचे राज्यसंयोजक आदरणीय विक्रम अडसूळ यांचे अध्यक्षतेखाली गुणवंतांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात जि.प.प्रा.शाळा दत्तवाडीची माजी विद्यार्थीनी व सध्या रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड येथे इ.6वीला शिक्षण घेत असलेली कु.दिव्या पांडुरंग मुरूमकर हिचा राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल गौरव करण्यात आला.
नुकताच ‘नवभारत ग्रुप व आरोग्य मंत्रालय ,महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने आरोग्यसेवेच्या भरीव योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा ‘ सर्वोत्कृष्ट डायबेटीज सेंटर’ हा पुरस्कार प्राप्त झालेल्या न्युक्लिअस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर अहमदनगरचे संचालक मा. डॉ. गोपाल बहुरूपी व डॉ. सुधीर बोरकर यांच्या शुभहस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
जे. बी. क्रियेशन व ‘दी विद्यावर्धिनी एज्युकेशन सोसायटी , ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. मातोश्री रमाबाई नामदेव बेलवले’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय online कथाकथन स्पर्धेत दिव्याने विशेष यश संपादित केले. या स्पर्धेसाठी तिने मनोहर इनामदार लिखित ‘जिद्द’ या सत्यघटनाधिष्ठीत व प्रेरणादायी कथेचे अप्रतिम सादरीकरण केले होते.
या गुणवंतांच्या गौरव समारंभात दिव्यासह लहान गटातील चि. विराज खामकर (राहुरी) व मध्यम गटातील कु. स्वानंदी ठाणगे (नेवासा) यांचादेखील राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्र समूहाचे राज्य सहसंयोजक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, दैनिक दिव्य मराठी अहमदनगरचे उपसंपादक अनिलकुमार हिवाळे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य नेते राजेंद्र निमसे तसेच तुकाराम अडसूळ, लहु बोराटे, विवेकांद खामकर, लक्ष्मीकांत इडलवार, सिद्धनाथ कचरे, गणेश कांबळे, श्रीनिवास एल्लाराम, अनिल ठाणगे, राहुल आठरे ,शितल झरेकर,शोभा कोकाटे,क्रांती करजगीकर,स्वाती आहिरे, संजना चेमटे इ.उपक्रमशील शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.