सौताडा येथील रामेश्वर धबधबा येथे पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू
जामखेड पासुन जवळच असलेल्या सौताडा येथील रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा धबधब्याजवळील तलावात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शंकर भगवान कोळेकर, रा. बहादुरपूर, नारायण गड, जिल्हा व तालुका बीड असे बुडुन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जामखेड पासुन अवघ्या दहा किमी अंतरावरील मात्र पाटोदा तालुका हद्दीत येत आसलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर येथील श्रावण महिन्यामध्ये यात्रा उत्सव सुरू असून येथे महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात.
काल रविवार दि 3 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड जिल्हा व तालुक्यातील बहादुरपूर नारायण गड येथील काही युवक आपल्या मोटरसायकल वरती सौताडा रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते.
देवदर्शन आटोपल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी पाणी पडते त्या ठिकाणी जाऊन पाण्यामध्ये पोहण्यास सुरुवात केली पाण्यामध्ये पोहत असताना बरेच अंतरावरती गेल्या वरती माघारी येत असताना. शंकर भगवान कोळेकर हा पाण्यामध्ये बुडाला त्याचा सौताडा येथील रामकिसन सानप व मित्रांनी पाण्यामध्ये बराच वेळ शोध घेतला पण तो आढळून आला नाही.
त्यानंतर त्यांनी वन खात्यातील काही अधिकाऱ्यांना त्याची खबर दिली. सदर युवक सापडत नसल्यामुळे पाण्यातील टाकण्याचा गळ आणला व त्यांनी शंकर कोळेकर यास पाहण्यास सुरुवात केली अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांना शंकर कोळेकर यास वर काढण्यात यश आले.
यानंतर त्यास पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मच्छिंद्र उबाळे हे करत आहेत यावेळी अभिमान शिंदे, प्रशांत घुले, मोहन सानप व पार्थ कुमार शिंदे सह आदी सौताडा गावातील युवकांनी सहकार्य केले.