श्रीनागेश्वर सप्ताहास बुधवारी प्रारंभ, आज विना पुजन
चाळासाठी प्रसिद्ध असणारी जामखेडची नागपंचमी टाळासाठी प्रसिद्ध
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार पासून सप्ताहस प्रारंभ होईल तर श्री नागेश्वर पालखी सोहळा नागपंचमी च्या दिवशी २९ जुलै रोजी होईल. एकेकाळी जामखेड ची नागपंचमी चाळासाठी प्रसिद्ध होती आता हरिनाम सप्ताह व शहरात भरवण्यात येणारा भव्य कुस्ती आखाडा यासाठी प्रसिद्ध होत आहे.
गुरुवारी दुपारी दोन वाजता विना पूजन करून सप्ताहस प्रारंभ होईल. सप्ताहा निमित्त दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8:30 ते 10 शिवलीलामृत पारायण 10 ते 12 वा. गाथा भजन, दुपारी 4. 30 ते 5.30 वा. प्रवचन , 5.30 ते 6.30 वा. सायंकाळी 7 ते 9 वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी २४ जुलै रोजी सायंकाळी 7 ते 9 विजय महाराज बागडे यांचे कीर्तन होईल.
२५ जुलै गोविंद महाराज जाटदेवळेकर
२६ जुलै विक्रांत महाराज पोंडेकर कल्याण
२७ जुलै सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्त अध्यापक उल्हास महाराज सूर्यवंशी २८ जुलै सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये
२९ जुलै जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज देहुकर
३० जुलै रोजी रात्री सात ते नऊ वाजता ह. भ. प. चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कीर्तन होईल.
गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगत होईल.
पालखी सोहळा मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. परीसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
या संपूर्ण उत्सवाची तयारी झाली असून श्री नागेश्वर सेवा मंडळ व भक्त मंडळातील सर्व भक्त व सप्ताह समितीतील सर्व सदस्य हा उत्सव साजरा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.