महिनाभरात अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्धवस्त करणारा जनतेच्या मनातील सिंघम अधिकारी संतोष खाडे

0
938

जामखेड न्युज—–

महिनाभरात अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्धवस्त करणारा जनतेच्या मनातील सिंघम अधिकारी संतोष खाडे

परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी अवघ्या 33 दिवसांत जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्धवस्त करत जवळपास सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 54 आरोपींवर कारवाई करण्यात आली यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांना धडकी बसली तर जनतेच्या मनात सिंघम अधिकारी म्हणून संतोष खाडे यांनी स्थान निर्माण केले.

परिविक्षाधिन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी 33 दिवसांत 54 धडाकेबाज कामगिरी करत 260 आरोपींवर कारवाई केली एकुण 5 कोटी 96 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्धवस्त करण्यात आले. यामुळे जनतेच्या मनात एक आदर्श स्थान निर्माण केले आहे.

अवैध धंद्यांवर कारवाई करत शाळा काॅलेज मध्ये प्रेरणादायी व्याख्याने देत मुलांचे प्रबोधन केले आहे. शालेय जीवनात विद्यार्थी अभ्यासाच्या जोरावर कोणतीही नोकरी मिळवू शकतात. सामान्य कुटुंबातूनही चांगला अभ्यास करून चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत आले पाहिजे. आपल्या बौद्धिक, शारीरिक, आर्थिक क्षमता ओळखल्या पाहिजेत. त्यानुसार आपल्याला नोकरीच्या भरपूर संधी मिळू शकतात.

विद्यार्थ्यांनी जीवनात काहीतरी वेगळेपणाने सामर्थ्याने पुढे आले पाहिजे. आई- बापांना स्वप्न दाखवून तुम्ही आला आहात. त्यासाठी कष्ट घेण्याची, घाम गाळण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी स्वतःला झोकून घ्या, अन्यथा स्वप्नांपासून दूर जाल. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले.

परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध धंदे विरोधात महिनाभरात धडक मोहीम उघडली असून संपूर्ण जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यात गुटखा, मटका, अवैध दारू तसेच अवैध वाळू उपसा करणारे यांच्या वर कारवाई चा बडगा सुरू केला आहे. जिल्ह्यातील पथक तालुकावार जाऊन कारवाई करत आहे तर तालुक्यातील पोलीसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी सध्या राजरोस ऐवजी चोरून लपून मटका सुरू आहे तसेच गुटखा विक्री सुरू आहे. किंमती मात्र वाढवल्या आहेत. यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे बाबत आदेश दिले होते यानुसार एका महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अनेकांना वर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here