अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात पाय बसविणे शिबीर संपन्न
विखे फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत – आकाश शेठ बाफना अध्यक्ष, आदर्श फाऊंडेशन जामखेड
डॉ.विठ्ठलराव विखेपाटील फाऊंडेशन संचलित , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद अहिल्या नगर, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्का) कानपूर , व एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात पाय बसविणे व कॅपिलर मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिराचे आयोजन जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली येथे करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पंचायत समिती चे विस्तार अधिकारी विजय शेवाळे, जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम सर, प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश शेठ बाफना, करण ढवळे, ॲड,अरबाज सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभेदार म्हणाले की, बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करत आहेत आणि नेहमी करत राहणार… महाराष्ट्र शासन आणि विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शिबिराबददल आभार व्यक्त केले.
यावेळी आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश शेठ बाफना म्हणाले की, विठ्ठलराव विखे फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव बसविणे बाबतचे शिबीर आयोजित केल्याबद्दल डॉ. सुजय दादा विखेपाटील यांचे तर दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनातर्फे भरघोस निधी व पगार वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार मानले.
यावेळी जामखेड पंचायत समिती चे विस्तार अधिकारी विजय शेवाळे, जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम सर, प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश शेठ बाफना, डॉ.यशस चुंबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा. संचालक करण ढवळे, सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल गवारे, व प्रमोद आढे,
दिपाली नागरगोजे विषय शिक्षिका BRC जामखेड, ॲड,अरबाज सय्यद , शिवाजी वडेकर, राहुल भालेराव, निवासी मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक संदिप शिंगणापूरे, संतोष आडसुळ, अक्षय गन्हे, आदी सह कर्जत जामखेड तालुक्यातील दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर शिबीरामध्ये १०० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.