अंदुरे परिवाराचे सामाजिक दायित्व महादेव मंदिर परिसरातील भाविक भक्तांसाठी बोअरवेल
पिण्याच्या पाण्याची सोय
जामखेड शहरातील तपनेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन उद्योजक उमाकांत अंदुरे यांच्या वतीने मंदिर परिसरात बोअरवेल घेण्यात आला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली आहे.
सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अंदुरे यांनी घेतलेल्या बोअरवेल मुळे मंदिर परिसरातील भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली आहे.
भाविक भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल, असे मत उमाकांत अंदुरे यांनी व्यक्त केले. या वेळी युवा उद्योजक सागरशेठ अंदुरे म्हणाले की, माझ्या वडील नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
तपनेश्वर येथील महादेव मंदिर येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अंदुरे परिवाराकडून बोअरवेल व विद्युतपंप देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अंदुरे परिवार करत आहे.
यावेळी उद्योजक उमाकांत अंदुरे यांच्यासह सर्व परिवाराचा महादेव मंदिर येथील पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.