संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध मराठा-बहुजन समाजाच्या संघटनांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे तहसीलदार यांना निवेदन

0
300

जामखेड न्युज—–

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध

मराठा-बहुजन समाजाच्या संघटनांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे तहसीलदार यांना निवेदन

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा आज जामखेड येथे मराठा-बहुजन समाजाच्या संघटनांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देत जाहीर निषेध केला.

निवेदन देतावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट या ठिकाणी शाईफेकीची घटना घडली.सदर ठिकाणी प्रवीण गायकवाड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाजत गाजत ते कार्यक्रमस्थळी जात होते. या दरम्यान त्यांच्यावर शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेकीचा हल्ला केला.

विशेष म्हणजे यावेळी त्यांना धक्काबुक्की देखील करण्याचा प्रयत्न झाला. प्रविण गायकवाड हे गेल्या 30 वर्षापासून मराठा बहुजन समाजासाठी कार्यरत आहेत. तरुणांनी उद्योग व्यवसाय करुन आर्थिक सक्षम व्हावे यासाठी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा” या अभियानातुन ते सतत प्रयत्नशील आहेत. प्रविणदादांनी जे कार्य उभे केलेले आहे, ते क्रांतीचं वादळ आहे. या वादळात हजारो तरुणांना शिक्षण उद्योजकता, आत्मभान आणि सामाजिक सन्मान लाभले आहेत. आजही ते मराठा-बहुजन समाजासाठी कार्यरत आहेत.

दंगलीसाठी दगड उचलणाऱ्या हजारो हातामध्ये लेखणी व डोक्यात शिवरायांचे शिवविचार घालण्याचे काम प्रविण गायकवाड यांनी केले आहे. प्रविण गायकवाड हे संविधान वादी विचाराचे नेते आहेत. ते ज्या संघटनेचे नेतृत्व करतात ती संभाजी ब्रिगेड महापुरुषांच्या सन्मानार्थ आणि मराठा आरक्षण लढ्यात कायम आघाडीवर राहिली आहे.हल्लेखोर हे गुंड प्रवृत्तीचे आहेत.

त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.त्यांना कठोर शासन करावे. तसेच या हल्ल्यामागे असलेल्या राजकीय शक्तींचा पर्दाफाश करुन भविष्यात अशा हल्ल्यांना आळा बसण्यासाठी ठोस कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी उपस्थित मराठा समन्वयक अवधूत पवार, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, नगराध्यक्ष निखिल घायतडक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, आदिवासी नेते प्रकाश काळे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कुंडल राळेभात, उद्योजक सुनील जगताप, प्राचार्य विकी घायतडक, गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, प्रहार जनशक्तीचे जयसिंग उगले, तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, ॲड. हर्षल डोके, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, शहराध्यक्ष वसीम सय्यद, नगरसेवक अर्षद शेख, भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, राजन मेघडंबर, अशोक पठाडे, अशोक घुमरे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, हरिभाऊ आजबे, सरपंच सागर कोल्हे, गणेश म्हस्के, किरण पवार, प्रशांत वारे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. शहाजी डोके सर, पोपट लोखंडे, शिवा लोखंडे, काकासाहेब कोल्हे, ज्ञानदेव ढवळे, दत्तात्रय डिसले आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here