शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हेवाडी बस सुरू करा ग्रामस्थ व शाळेची मागणी
पिंपळवाडी व कडभनवाडी बस कोल्हेवाडी पर्यंत सुरू करावी
अहिल्यादेवी होळकर मुलींसाठी मोफत बस कोल्हेवाडी पर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी श्री साकेश्वर विद्यालय, कोल्हेवाडी, साकत येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे निवेदन आगार व्यवस्थापक शशी खटावकर यांना दिले आहे.
निवेदन देताना भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, पांडुरंग माने विभागप्रमुख NCP – SP उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा, साकतचे उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, मुख्याध्यापक दत्ता काळे, कुंडल राळेभात, विक्रांत घायतडक, तुषार बोथरा, सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे पिंपळवाडी, कडभनवाडी, कोल्हेवाडी येथील विद्यार्थी शाळेत येतात सध्या पिंपळवाडी व कडभनवाडी येथे बस सुरू आहे. कोल्हेवाडी पर्यंत बस सुरू करावी अशी ग्रामस्थ, शाळा, विद्यार्थी यांनी मागणी केली आहे.
सध्या साकेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत पिंपळवाडी व कोल्हेवाडी येथील ४८ मुली व १५ मुले शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सुरू आहे.
चालू वर्षी कोल्हेवाडी येथील नव्याने एकुण ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे यात २० मुली व १० मुले आहेत तेव्हा कोल्हेवाडी पर्यंत बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोल्हेवाडी पर्यंत बस सुरू झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी फायदा होईल तेव्हा पिंपळवाडी कडभनवाडी बस कोल्हेवाडी पर्यंत सुरू करावी अशी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.