जामखेड तालुक्यातील गट गण प्रारूप प्रभाग रचना जाहीर
पहा कोणते गाव कोणत्या गटात व गणात
जामखेड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.
जामखेड मधील ३ गट आणि ६ गण खालीप्रमाणे आहेत.
गटाचे नाव ७३ साकत गणाचे नाव १४५ शिऊर या गणामध्ये मोहा, सावरगाव, राजुरी, डोळेवाडी, शिऊर, घोडेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सारोळा, काटेवाडी, पाडळी खुरदैठण अशा दहा ग्रामपंचायत तर १२ गावे समाविष्ट आहेत.
गणाचे नाव १४६ साकत
साकत,कोल्हेवाडी, पिंपळवाडी, देवदैठण, नाहुली, नायगाव, जायभायवाडी, बांधखडक, तेलंगशी, आनंदवाडी, पिंपळगाव आळवा, धामणगाव असे एकूण दहा ग्रामपंचायत तर १२ गावांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद गटाचे नाव ७४ खर्डा गणाचे नाव १४७ खर्डा यामध्ये खर्डा, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जातेगाव, लोणी बाळगव्हाण अशा सहा ग्रामपंचायत तर ११ गावाचा समावेश आहे.
गणाचे नाव १४८ नान्नज नान्नज, आपटी, वाकी, सातेफळ, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौंडाचीवाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, राजेवाडी, गुरेवाडी, महारूळी, पोतेवाडी, वाघा अशा तेरा ग्रामपंचायत तर १६ गावे समाविष्ट आहेत.
७५ जवळा जिल्हा परिषद गट १४९ अरणगाव गणात डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, धानोरा, वंजारवाडी, रत्नापूर, सांगवी, कुसडगाव, सदरवाडी, खांडवी, डिसलेवाडी अशा आठ ग्रामपंचायत तर १४ गावे समाविष्ट आहेत.
१५० जवळा गणात मुंजेवाडी, चोभेवाडी, बोर्ले, चौंडी, आघी, मतेवाडी, जवळा, कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी, हाळगाव अशा ११ ग्रामपंचायत तर १३ गावे समाविष्ट आहेत.
अशा प्रकारे तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.