सरपंच सागर कोल्हे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर निवारा बालगृहातील मुलांना शालेय साहित्य

0
344

जामखेड न्युज—–

सरपंच सागर कोल्हे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर निवारा बालगृहातील मुलांना शालेय साहित्य

राजुरी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सागर कोल्हे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी साकत जिल्हा परिषद गटातील सुमारे ५,००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यामध्ये वह्या, रजिस्टर, पेन, खोडरबर, शिसपेन्सिल, शॉपनेयर यांचा समावेश होता.

याच उपक्रमाअंतर्गत मोहाफाटा येथील ग्रामीण विकास केंद्राच्या निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर व विट भट्टी कामगार कुटुंबातील वंचित मुला-मुलींनाही शालेय साहित्य देण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस निवारा बालगृहातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून सागर कोल्हे यांचे औक्षण केले. या प्रसंगी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी कोल्हे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब कोल्हे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, दत्तात्रय डिसले, शिवहरी आजबे, तसेच निवारा बालगृहाचे शिक्षक तुकाराम शिंदे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

युवा उद्योजक तसेच राजुरीचे सरपंच सागर कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत देशाची युवा पिढी सक्षम व्हावी यासाठी साकत गटातील जिल्हा परिषद तसेच काही माध्यमिक विद्यालय व अंगणवाडी, निवारा बालगृह अशा सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन, शिसपेन्शिल, खोडरबर, शॉपनर अशा शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला.


राजुरीचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सागर कोल्हे यांनी आपला वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यावेळी प्रत्येक गावातील युवा कार्यकर्त्यांनी एकच मागणी लावून धरली आहे की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कोल्हे यांनी साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी अशी सर्व युवकांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here