- जामखेड प्रतिनिधी
श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध
निवडून आल्याने पॅनलमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. बाकीच्या आकरा ही जागा मोठ्या मताधिक्यांनी जिंकण्याचा निर्धार पॅनल प्रमुख संजय वराट यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी साकत ग्रामपंचायतीच्या एकुण 13 जागा आहेत यापैकी प्रभाग दोन मधुन मैना शिवाजी कोल्हे तर प्रभाग चार मधुन राजू वराट हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पॅनलमध्ये नवा उत्साह संचारला आहे. पॅनल प्रमुख म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरूण वर्ग आहे. दोन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी डॉ. सुनील वराट,अविनाश लहाने, प्रा. कैलास वराट, युवराज वराट, दादासाहेब लहाने, गणेश वराट, भरत लहाने, शिवाजी मुरुमकर, महादेव वराट, शहादेव वराट, माणिक वराट, विठ्ठल वराट, वसंत वराट, कृष्णा पुलवळे, श्रीराम घोडेस्वार, राहुल वराट, सचिन वराट, प्रा. विकास वराट, प्रा. मुकुंद वराट, प्रा. युवराज मुरुमकर, महादेव वराट, रामहारी वराट,
बिभिषण वराट, शरद वराट, अशोक वराट, पांडुरंग अडसुळ, रोहित घोडेस्वार, प्रदीप लहाने, रामभाऊ वराट, विशाल वराट, अजित वराट यांच्या सह अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.