पितापुत्राच्या मृत्यू प्रकरणी वायरमनवर खर्डा पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
1201

जामखेड न्युज—–

पितापुत्राच्या मृत्यू प्रकरणी वायरमनवर खर्डा पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

तालुक्यातील बाळगव्हान येथे सोमवारी शेतात काम करत असताना तुटलेल्या ताराला स्पर्श होऊन बाप लेकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित वायरमनवर खर्डा पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शेतामध्ये काम करीत असताना तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन काकासाहेब शिकारे व महेश शिकारे या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अखेर वायरमन शितल हुलगुंडे याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,दिनांक 23 जून 2025 रोजी काकासाहेब शिकारे वय 44 वर्ष व त्यांचा मुलगा महेश शिकारे वय 15 वर्षे हे दोघे बापलेक शेतामध्ये खते टाकत असताना तुटलेला वीजतारांना चिटकून शॉक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या भागातील ड्युटीवर असलेले वायरमन शितल मधुकर हुलगुंडे यांनी बाळगव्हाण शिवारातील विजेच्या इलेक्ट्रिक तारा तुटल्याने वीज कनेक्शन बंद न केल्यास कोणाचाही जीव जाऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा व सदरच्या तुटलेल्या तारा त्यांना सांगूनही त्यांनी काही एक दुरुस्ती केली नाही तारा मधील करंट बंद केला नाही.

कामात हलगर्जी पणा केल्यामुळे सदरच्या तुटलेल्या तारांना शिकारे पिता, पुत्राच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा गुन्हा इंद्रराज सदाशिव शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार एस.जी. धामणे यांनी दाखल करून घेतला आहे.

याबाबत पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here