Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी पोलीस निलंबित

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी पोलीस निलंबित

0
2625

जामखेड न्युज——

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी पोलीस निलंबित

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारा बाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी असणारे पोलीस निलंबित करण्यात आले आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दिनांक २२ जून २०२५ रोजीच्या अहिल्यानगर शहरातील दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा व राजशिष्टाचारा बाबतच्या त्रुटी आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केलेले पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांना पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निलंबित केले आहे.

अहिल्यानगर संलग्न जिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर परिक्षेत्राचे पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सावेडी, अहिल्यानगर येथील नियोजित दौऱ्यादरम्यान

सुरक्षासेवेत कायदेशीर कर्तव्य पार न पाडल्याने व बेजबाबदार, बेशिस्त आणि हलगर्जीपणाचे वर्तन केल्याने शासन सेवेतून त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त न नेमल्याची तसेच स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बंदोबस्तासाठी हजर नसल्याची बाब चौकशीअंती स्पष्ट झाली असता सदरील कसुरीबाबत चौकशी करण्यात आली.

चौकशीअंती दोषी पोलिस पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कडक कारवाई व निलंबनाचे आदेश अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!