सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथून 55 मुलींची टीम प्रतापगड किल्ला स्वच्छतेसाठी रवाना जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकारातून गड किल्ले स्वच्छता मोहिम
सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथून 55 मुलींची टीम प्रतापगड किल्ला स्वच्छतेसाठी रवाना
जामखेड महिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकारातून गड किल्ले स्वच्छता मोहिम
जामखेड भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित मुलींना मोफत गड कोट किल्ले मोहिमे अंतर्गत प्रतापगड किल्ले मोहिम तसेच किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी जामखेड येथून आज सायंकाळी नऊ वाजता प्रतापगड कडे रवाना झाली.
यावेळी भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, रोहिणीताई संजय काशिद, केशवराज कोल्हे, मुकुंद सातपुते, रावसाहेब नेटके, संतोष गिरी, प्रमोद टेकाळे, पप्पू दाहितोडे, छगन क्षिरसागर पेंटर, दिपक सुरसे, सागर कांबळे, रमेश कांबळे, युवराज उबाळे, बाळू जगदाळे, विशाल निमोणकर, राजेंद्र बोराटे, विठ्ठल वीर, बाळू निमोणकर, लक्ष्मण वीर यांच्या सह अनेक पालक मुलींना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.
सौ. रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला) रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.
शनिवार दि. १४ रोजी सायंकाळी 9.00 वा. जामखेड येथील लक्ष्मी चौक (रूद्रा पेंटस् समोर)सुमारे 55 मुलींनी प्रतापगडाकडे प्रस्तान केले.उद्या रविवार दि. १५ रोजी प्रतापगड किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई संजय काशिद यांनी महिला व मुलींसाठी मोफत गड कोट किल्ले मोहिमेंतर्गत प्रतापगड किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. लहान वयातच स्वच्छता व स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे.
दरवर्षी रोहिणीताई संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली गड कोट किल्ले मोहिमेंतर्गत एका किल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यानुसार रायगड, शिवनेरी, सिंहगड आणि या वर्षी प्रतापगड किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.